Mumbai : देशासह राज्यामध्ये दिवसागणिक महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामुळे महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण वाढत असल्याचं बघायला मिळतंय, यासाठीच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुण मुलींना आता स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा वर्षानिमित्ताने राज्यामध्ये 3 लाख 50 हजार शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने गुरुपौर्णिमेच औचित्य साधत तीन ते 15 जुलै या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण दिल जाणार आहे. तीन दिवसांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम राहणार आहे.
महाराष्ट्रातील सर्वच तालुक्यांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहेत मुलींसाठी स्वसंरक्षणाचा समावेश हा अभ्यासक्रमामध्ये करण्यात यावा यासाठी आपण शालेय शिक्षण विभागाला विनंती करणार असल्याचे देखील मंत्री लोढा यांनी सांगितल आहे.
गेल्या काही वर्षांपासून महिला आणि मुलींवर होत असलेल्या हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटना समाज आणि शासनासाठी मोठं आव्हान ठरताय, याला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे महत्त्वाच आहे. याच अनुषंगाने राज्य शासन विविध उपायोजना करण्याचा प्रयत्न करतय, यात महिला आणि बालविकास विभागाने देखील पुढाकार घेत हे प्रशिक्षण वर्ग राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसारच शाळकरी मुली आणि तरुणींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी “राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम” राज्यभरात राबविण्यात येत आहे. महिला आणि बाल विकास विभागामार्फत सर्व विद्यापीठ स्वयंसेवी संस्था व महाविद्यालय यांच्या सहकार्याने तालुका स्तरावर या शिबिरांचं आयोजन करण्यात आल आहे. या शिबिरा मार्फत मुलींना कायमस्वरूपी स्वरक्षणाचे धडे मिळावे असा यामागचा हेतू आहे. तर शालेय अभ्यासात देखील लवकरात लवकर याचा समावेश व्हावा यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत अस त्यांनी सांगितलंय,
दरम्यान याबाबत शालेय शिक्षण विभाग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण शालेय शिक्षणामध्ये स्वसंरक्षणाचे धडे देण्यात यावे अशी मागणी लवकरच करणार आहोत असं देखील महिला व बालविकास कल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम