The point now – Swati kadam
जर तुम्ही दररोज प्रवास करत असाल तर तुम्हाला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक सोपा होईल. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच काही उपकरणे घेऊन आलो आहोत ज्यामुळे प्रवास अधिक प्रमाणात सोपा होतो.
• प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्यासोबत पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर ठेवावा . खरे तर टायर पंक्चर झाल्यास ते तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी उपयोगी पडते.
• जेव्हा तुम्ही प्रवास करत असाल तेव्हा तुम्ही वायर्ड इअरफोन्स ठेवावेत कारण जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून थेट संगीत ऐकता तेव्हा तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी खूप वेगाने संपते. आणि डायरेक्ट संगीत ऐकलं आणि लोकांना पण त्रास होऊ शकतो म्हणून हेडफोन्स असणे हे गरजेचे आहे.
• प्रवास करताना तुम्ही सोलर पॅनल वर चालणारा दिवा ठेवावा खरं तर तुम्ही तो सूर्यप्रकाशात चांगला चार्ज करू शकता आणि तो वजनाने खूप हलका आहे . त्यामुळे तो सहज कुठेही नेता येतो. जर तुम्ही जंगलात किंवा कुठे कॅम्पिंगला गेला तिथे तुम्ही सोलरचा वापर करून गोष्टी चार्ज करू शकता.
• जेव्हा तुम्ही प्रवास करत असता त्या काळात तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इतर अनेक उपकरणे असतात ज्यांना चार्जिंगची आवश्यकता असते अशा परिस्थितीत बॅटरी संपली की तुम्हाला लगेच पॉवर सोर्स मिळणे आवश्यक नाही. अशा प्रकारे तुम्ही नेहमी तुमच्यासोबत मजबूत बॅटरी असलेली पॉवर बँक ठेवावा. ही पॉवर बँक तुमच्या स्मार्टफोनसह इतर अनेक उपकरणे चार्ज करू शकते. आणि त्यामुळे तुम्हाला बाहेर प्रवास करताना त्रास होणार नाही तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचे फोन चार्ज करू शकता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम