थंडीत घसा खवखवण्याचे कारण? आणि त्यावर घरगुती रामबाण उपाय 


The point now – Swati kadam

घसा खवखवण्यावर उपाय: घसा खवखवणे किंवा कर्कश होणे हे खूप वेदनादायक ठरू शकते कारण बोलल्याशिवाय काम चालू शकत नाही. आणि बोलल्यावर अधिक प्रमाणात त्रास होतो तर यासाठी काय करावे जाणून घ्या सविस्तर

हिवाळा आला की सर्दी आणि खोकला होणे हे सामान्य आहे अशा स्थितीत माणसाचा घसा खराब होतो आणि मग तुमचा आवाज बदलू लागतो. ज्यामुळे तुम्हालाही त्रास होऊ शकतो. घसा दुखल्यामुळे बोलताना त्रास होतोच होतो तर जेवताना सुद्धा अन्न गिळताना त्रास होतो खरं तर या ऋतूमध्ये संसर्गाचा धोका उन्हाळ्यापेक्षा जास्त असतो. म्हणूनच हिवाळ्यात आपल्याला अधिक सावध राहण्याची गरज आहे. मात्र घसा खवखवल्यास घाबरण्याची गरज नाही. काही सोप्या आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.

• आले (आलं)

आल्याचा वापर आपण मसाला म्हणून करतो . चहा बनवताना चहा मध्ये टाकतो .त्याचा उपयोग अनेक पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. त्याचा प्रभाव उष्ण असतो म्हणूनच हिवाळ्यात त्याचे महत्त्व वाढते. घसा दुखत असताना आले काळी मिरी आणि मध एकत्र करून चांगले बारीक करून या मिश्रणाचे सेवन करा. यामुळे घशात उष्णता पसरेल आणि आपण अनेक प्रकारच्या इन्फेक्शन होण्यापासून लांब राहतो आणि आपला त्रास ही कमी होतो. आले हे खोकल्यासाठी रामबाण औषध मानले जाते.

• याशिवाय तुम्ही हळद आणि अद्रकला बारीक कुटून त्याच्यामध्ये थोडं मध टाकून याचे सेवन करू शकता रोज सकाळ संध्याकाळचे सेवन केल्याने तुमची सर्दी आणि खोकला दूर होईल.

• घसा खवखवल्यामुळे जेवता नाही बऱ्याच वेळी त्रास सहन करावा लागतो परंतु अशा स्थितीत जेवण सोडणे हा पर्याय नाही तर या उलट तुम्ही एका भांड्यात एक ग्लास पाणी घेऊन त्यात एक चिमूटभर मीठ टाकून कोमट करून घ्या त्यानंतर तुम्ही त्या पाण्याने गुळण्या करा यामुळे तुमच्या घशाला शेक मिळते आणि त्रास कमी होऊ लागतो. म्हणजे जेवताना अन्न गिळताना मोठ्या प्रमाणात त्रास होत नाही

• जेव्हा तुमचा घसा दुखत असेल तेव्हा अशा गोष्टी अजिबात खाऊ नका

घसादुखीमुळे तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाल्ले तर घसा खवखवणे आणखी वाढेल. त्यामुळे शक्यतो भजे,पुरी, समोसे, फ्रेंच फ्राईज, बटाट्याच्या टिक्की खाणे टाळावे. याशिवाय या आजारात दह्याचे सेवन बंद करावे कारण त्याचा प्रभाव थंड असतो. बाहेरच्या गोष्टी खाणे टाळावे यामुळे तुमचा घसा लवकर बरा होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!