सध्या राजकीय वातावरणात एकच खळबळ माजली आहे. राजकारणात हनुमान चालीसा आणि भोंगांवरून विरोधकांमध्ये आमना सामना होताना दिसत आहे. राणा दांपत्य मातोश्री वर हनुमान चालीसाचे पठण करण्याकरता येणार आहेत. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे. तर नवनित राणा त्यांच्या मुंबईतील घराबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करत आहे. तर विनायक राऊत यांनी राणा दाम्पत्यांना टोला लगावला.
तुम्ही कधीही या, पंधरा तासांनी जरी आले तरी आम्ही इथेच आहोत. आम्ही तुमची वाट बघत आहे. शिवसैनिक तुम्हाला प्रसाद देतील, असा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणा दाम्पत्याला दिली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी राणांच्या इमारतीखाली मोठ्या संख्येने गर्दी केली. आम्ही अमरावतीचा कचरा साफ करण्यासाठी आलो असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. तसेच राणांच्या घराबाहेर ‘बोल बजरंग बली की जय’अशा घोषणाबाजी करण्यात आली. खारमधील राणा दाम्पत्याच्या इमारतीच्या गेटवर मारुतीस्तोत्राचे सामुहीक वाचन करण्यात आले. एकतर तुम्ही खाली या, नाहीतर आम्ही वर येतो, असा इशारा शिवसैनिकांनी दिल आहे.
शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेरील सुरक्षादरवाजे तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची देखील झाली. तर दुसरीकडे शिवसैनिक कार्यकर्त्यांनी तिथून जात असलेले भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवरही हल्ला केला. नवनीत आणि रवी राणा सध्या त्यांच्या खारच्या घरी उपस्थित असून त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित आहे. आज रवी आणि नवनीत राणा येथे आल्यास चकमक होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. संघर्षाची परिस्थिती पाहता मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम