विकी गवळी|Chandwad| नाशिकच्या चांदवड तालुक्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरु आहे. आज उपोषणाच्या सहाव्या दिवशी तालुक्यात वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, सकाळी अकराच्या सुमारास मुंबई आग्रारोडवर महामंडळाच्या बस थांबवून आंदोलकांनी बसवरील नेत्यांच्या फोटोला काळे फासले.
साहेब तुम्ही मराठा नाही का ?
दुपारी एकच्या सुमारास मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर हे त्यांच्या कार्यालयाकडे त्यांच्या वाहनाने जात असतांना मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडविली. यावेळी उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांनी आमदार राहुल आहेर यांची चांगलीच खरडपट्टी काढली. “आजपर्यंत तुमचे सरकार असतांना तुम्ही मराठा आरक्षणासाठी आग्रही भुमिका का मांडली नाही?” तसेच याठिकाणी गेल्या सहा दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. तुमचे डॉ. आत्माराम कुंभार्डे हे सोडता इतर कोणीही याठिकाणी फिरकलेही नाही. तुम्ही पाठींबा द्यायला का आले नाही तुम्ही मराठा नाहीये का?. अश्या संतप्त सवालांचा पाढाच आंदोलकांनी आमदार राहुल आहेरांसमोर वाचून दाखवला.
शिरीष कोतवालांनी आहेरांना सुनावलं…
यावर उत्तर देत आमदार आहेर यांनी सांगितले की, “मी मराठा असून आपल्या आंदोलनालाही माझा पाठींबा आहे. सरकारकडेही याबाबत मी मागणी केली आहे.” दरम्यान,असे बोलत असतांनाच माजी आ. शिरीषकुमार कोतवाल हे उपोषणस्थळी पोहचले. त्यांनी हे आंदोलन सहा दिवसांपासून सुरु असून, तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळे मराठा आरक्षणासाठी आक्रमक भुमिका घ्यायला पाहीजे. आणि वर प्रश्न मांडून मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायला पाहिजे. तर, गेल्या सहा दिवसांत डॉ.आत्माराम कुंभार्डे शिवाय एकही नेता आंदोलन स्थळी आले नाही. व मराठा आरक्षणाला पाठींबाही दिला नाही. या मुद्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली होती.
आ. राहुल आहेरांनी आरक्षणासाठी साधे एकपत्र देखील दिले नाही….
आमदार राहुल आहेर यांनी गोलमगोल भूमिका सोडावी. मी तुमच्यासोबत आहे हे म्हणायचं मात्र आजपर्यंत त्यांनी साधे एकपत्र देखील शासनाला पाठवले नाही. ही दुटप्पी भूमिका मराठा समाज खपवून घेणार नाही. गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू असताना आमदारांना पाचव्या दिवशी वेळ मिळाला यातच त्यांचे समाजाप्रती असलेले प्रेम दिसले. आम्ही समाज म्हणून याठिकाणी बसलो आहोत राजकीय जोडवे बाहेर ठेवले आहेत. कुणी खोट बोलत असेल तर आंदोलक चिडणे साहजिक आहे. आमदार आहेर यांना आंदोलकांनी हुसकून दिले. सर्व मराठा आमदारांनी राजीनामा द्यायला हवा जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण तात्काळ मिळेल.
– शिरीष कोतवाल, मा. आ. चांदवड – देवळा विधानसभा
यावेळी भडकलेल्या आंदोलकांनी आमदारांना उद्देशून “चले जाव, चले जाव”, भाजपा सरकारचा धिक्कार असो,अशा घोषणा दिल्या. आंदोलन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच आमदार राहुल आहेर चांदवडमध्ये आल्याने मराठा समाज आक्रमक झाला होता. शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, नंदकुमार कोतवाल, डॉ. सयाजीराव गायकवाड, गणेश निंबाळकर, प्रकाश शेळके, समाधान जामदार, बाळासाहेब गाडे, संपतबाबा वक्ते, घमाजी सोनवणे, चंद्रकांत देवरे, नीलेश ढगे आणि मराठा कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान, चांदवड येथे बस अडवत सरकारचा निषेध व्यक्त केला आणि बसवरील पंतप्रधान ,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरवर काळे फासले होते.
Deola| देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम