PSI Exam | महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी पेपर क्रमांक दोन येत्या रविवारी (दि. २९) नियोजित करण्यात आलेली आहे. या परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जारीदेखील करण्यात आलेल्या आहेत. यापूर्वी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या संयुक्त परीक्षेतील पेपर क्रमांक एक घेण्यात आलेला होता. आता पदनिहाय मुख्य परीक्षेचे पेपर क्रमांक-दोन पार पडणार आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार पोलिस उपनिरीक्षक (PSI) या पदासाठी रविवारी (दि. २९) पेपर क्रमांक-दोन राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर घेतल्या जाणार आहे.
Horoscope Today 27 October 2023: या राशीच्या लोकांवर संकटांचा डोंगर, जाणून घ्या आजचे राशी भविष्य
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना जारी
- परीक्षार्थींनी प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्याचे आयोगाने जारी केलेल्या सूचनांमध्ये स्पष्ट केलेले आहे.
- परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास आधी परीक्षार्थीनी उपस्थित राहावे.
- ओळखीच्या पुराव्यासाठी मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र आणि इतर मजकूर सुस्पष्ट दिसेल, अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत आणणे अनिवार्य
- परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी, इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही, असेदेखील सूचनापत्रकात नमूद केलेले आहे
Deola: देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष सुलभा आहेर यांचा राजीनामा
PSIची शारीरिक चाचणी नोव्हेंबरमध्ये; कसे असेल चाचणीचे स्वरूप?
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शारीरिक चाचणी होणार असून पंधराशे उमेदवारांना निवडीसाठी याद्वारे संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक विस्कळित झालेले होते.
- पुरुष उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे, पुलअप्स, गोळाफेक, लांबउडी या क्रीडा गटांतून चाचणी घेतली जाणार आहे.
- तर महिला उमेदवारांसाठी धावणे, लांब उडी, गोळाफेक या प्रकारांची चाचणी घेतली जाईल. वेळ, अंतरासंदर्भातील कामगिरीच्या आधारे गुणांकन केले जाईल. नवी मुंबई येथील पोलिस मैदानावर ही चाचणी घेतली जाणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम