वर्ल्डकप २०२३ | आज जगभरातील क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण वर्ल्डकप २०२३ फायनल सामना आज होतो आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे केवळ भारतच नाही तर संपुर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय संघाने हा वर्ल्डकप जिंकावा, यासाठी क्रिकेटप्रेमी त्यांना भरभरून शुभेच्छा देता आहेत. सध्या महाराष्ट्रातल्या शहराशहरात, गावागावात क्रिकेटचा फिवर पाहायला मिळतोय. भारतीय संघाच्या जर्सीसारखे T-Shirt घालून तरूणाई रस्त्यावर उतरलेली आहे. चला तर मग तुमच्या शहरातील अपडेट जाणनू घ्या…
Nashik News | अंजली दमानिया यांच्या आरोपांवर स्पष्टच बोलले समीर भुजबळ
नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर इंडिया-इंडियाचा जयघोष घुमतोय
वर्ल्डकप फायनलमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना होत आहे. त्यासाठी नाशिकमध्ये क्रिकेट प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय. भारत संघाला चिअरअप करण्यासाठी क्रिकेटप्रेमी एकवटलेले आहेत. गोल्फ क्लब मैदानावर क्रिकेट प्रेमींचा उत्साह पाहायला मिळत आहेत. यावेळी इंडिया-इंडियाचा जयघोष करण्यात येत आहे.
पुण्यात क्रिकेटपटूंच्या फोटोंना दुग्धाभिषेक केला
भारतीय संघाच्या विजयासाठी पुण्यात मनसेतर्फे दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे. विश्वचषकात भारताने विजय मिळवावा यासाठी पुण्यात दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे. मनसेतर्फे भारतीय संघाच्या खेळाडूंच्या कट-आउटला दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे. दुग्धाभिषेक करत भारतीय टीमला पुण्यातून प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे.
अहमदनगरमध्ये विठ्ठलाला घातलं साकडं
अहमदनगरमध्ये वर्ल्डकप मॅच जिंकण्यासाठी नागरिकांनी घातले विठ्ठलाकडे साकडं घालण्यात आलेलं आहे. अहमदाबाद इथे आज होणाऱ्या फायनल सामना जिंकण्यासाठी विठ्ठलाची आरती करून प्रार्थना केली गेली आहे. उपनगरातील सावेडी भागातील कजबे वस्तीवरील नागरिकांनी प्रार्थना केलेली आहे. भारतीय संघ हा सामना जिंकणार, असा विश्वास व्यक्त क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केला आहे.
IND vs AUS | थोड्याच वेळात रंगणार महामुकाबला; मैदानात अलोट गर्दी
नागपुरात उत्साह
नागपुरातील क्रिकेट अकॅडमीत क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय टीमचा उत्साह वाढविण्यासाठी घोषणाबाजी करण्यात येते आहे. टीम इंडियाचा विजय निश्चित असल्याचे हे क्रिकेटप्रेमी म्हणत आहेत. नागपूर जिल्ह्यात विश्वकप फायनलचा फिव्हर पाहायला मिळत आहे. नागपूर बुटीबोरीत क्रिकेट प्रेमींकडुन ‘विजयी भव’ पूजा करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मिसळ फ्री
पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट प्रेमी पाटील मिसळच्या हॉटेल मालकाने अनोखी ऑफर ठेवण्यात आलेली आहे. अंतिम सामन्याचा दिवस असल्याने या हॉटेल मध्ये दोन मिसळ वर एक मिसळ फ्री ठेवण्यात आलेली आहे. तर भारत जिंकणार असल्याचा विश्वास असल्याने त्यांनी उद्या एका मिसळ वर एक मिसळ फ्री ठेवलेली आहे.त्याचा क्रिकेटप्रेमी आस्वाद घेता आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम