World Cup 2023 | हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर; पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड का?

0
44

World Cup 2023 | टिम इंडियाचा स्टार ऑलराउंडर उपकर्णधार हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे तो वर्ल्डकपमधून बाहेर गेला आहे. हार्दिकशिवाय टीम इंडियाला सेमीफायनलचे शिवधनुष्य पेलायचे आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे, हार्दिक ऐवजी नव्या खेळाडूची संघात एन्ट्री झालेली आहे. हार्दिकऐवजी प्रसिद्ध कृष्णा याची विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांसाठी भारतीय संघात वर्णी लागली आहे.  प्रसिद्ध कृष्णाची संघातील निवड ही आश्चर्यकारकच म्हणावी लागेल. कारण प्रसिद्ध कृष्णा हा गोलंदाज आहे. दुखापतीमुळे हार्दिक वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यास त्याच्या जागी संघात एखाद्या अष्टपैलू खेळाडूचीच वर्णी लागेल अशी साधारण अपेक्षा होती. परंतु, शनिवारी स्पर्धेच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीतर्फे परवानगी मिळाल्यानंतर या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

Nashik | जायकवाडी पाणी प्रश्न पेटणार; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

प्रसिद्ध कृष्णाचे नक्की रेकॉर्ड्स

प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियाकडून 17 वनडे खेळले असून या सामन्यांमध्ये प्रसिद्ध कृष्णा याच्या नावावर 29 विकेट्स आहेत. 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाकडून शेवटचा वनडे सामना खेळलेला होता. जिथे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नऊ ओव्हर्समध्ये 1/45 देऊन डेव्हिड वॉर्नरची मौल्यवान विकेट घेतली. याशिवाय कृष्णाने दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळलेले आहेत, ज्यात त्याच्या नावावर एकूण 4 विकेट्स आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा कर्नाटकातून खेळतो.

अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान मिळालेले आहे. जसप्रीत बुमराहप्रमाणेच प्रसिद्धदेखील जवळपास वर्षभर दुखापतग्रस्त होता. पण आयर्लंड दौऱ्यावरुन तो माघारी परतला होता. आशिया चषक स्पर्धेतही तो भारतीय क्रिकेट संघाचा एक सहभाग होता. विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियासोबत एकदिवसीय मालिका खेळलेला होता. त्यातही प्रसिद्ध कृष्णा भारतीय संघाचा भाग होता.

नाशिक | आहेर बंधूंचे फडणवीसांना साकडे; चांदवड-देवळा होणार का दुष्काळ जाहीर?

हार्दिक पांड्या बाहेर पडल्याने भारतीय संघाला धक्का 

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विश्वचषक 2023 मधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळे तो भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर होता. पांड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाने सेमीफायनल्समध्ये दणक्यात प्रवेश केलेला आहे. यामध्ये ऑलराउंडर हार्दिक पांड्याचा सिंहाचा वाटा आहे. अशातच दुखापतीमुळे भरतीय संघातून बाहेर गेलेला हार्दिक पांड्या सेमीफायनलपर्यंत संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुखापतीमुळे हार्दिक पांड्या विश्वचषकाचे उर्वरित सामने खेळणार नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here