Winter Update | ऑक्टोबरअखेर गारव्याचा अनुभव घेतल्यानंतर सध्या वातावरणातून गारवा गायब झालेला दिसतोय. अशातच ऐन दिवाळीत नाशिककर पुन्हा गारठणार आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत (दि. १०) नाशिकचे किमान तापमान साधारणतः 2 अंशांनी घसरून 14 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतरही पाऱ्यामध्ये घसरण होऊन गारठा वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे.
Crime News | पोलीस स्टेशनसमोर बंद गाडीत सापडला मृतदेह
यंदाच्या वर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने आधीच चिंतेत वाढ झालेली आसताना नोव्हेंबर उजाडल्यानंतरही वातावरणात अपेक्षित गारवा अजुनही जाणवत नव्हता. काही दोन-चार दिवस सोडले तर अपेक्षेप्रमाणे थंडी जाणवलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून काहीसे ढगाळ वातावरण असल्याने थंडीचे प्रमाण कमी झालेले होते. मात्र आता आकाश निरभ्र होऊ लागले असून यामुळे गारव्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोमवारी (दि. ६) नाशिकचे किमान तापमान 16 अंश सेल्सिअस राहिले असून कमाल तापमान 30.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. यंदाच्या हंगामात 14.5 अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली गेलेला असताना पुन्हा एकदा वाढ झालेली होती. अशातच नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचे प्रतीक्षा लागून होती. दिवाळीत ही प्रतीक्षा संपणार असून शुक्रवार (दि. १०) पासून किमान तापमान 14 अंश सेल्सिअसच्या सुमारास राहाण्याची शक्यता आहे.
Nashik News | शिवभक्तांची मांदियाळी; पं. प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण नाशिकमध्ये होणार
हवामान खात्याचा अंदाज काय?
पुढील दोन दिवस बुधवार (दि. ८) पर्यंत सकाळच्या वेळी वातावरणात धुके तर दिवसातील काही वेळ ढगाळ वातावरण राहाण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे नाशिकचे किमान तापमान 17 अंश सेल्सिअसपर्यंत तर कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअस राहू शकते. गुरुवार (दि. ९) पासून आकाश निरभ्र राहणार असून या दिवसापासून तापमानाचा पारा घसरण्यास सुरवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम