Winter session | इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्ह्यांचं प्रमाण कमी; फडणवीसांचा अधिवेशनात दावा

0
56
Winter session
Winter session

Winter session | महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढत असल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून स्पष्ट होत असून यावरूनच आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडलेली आहे. सध्या नागपूर मध्ये महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यातच आज महाराष्ट्रातील गुन्हेगारीवर गृहमंत्र्यांनी विश्लेषण केलं आहे.

Mumbai Crime | धक्कादायक..! ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार करत मारहाण

एनसीआरबीच्या अहवालावरून फडणवीसांनी विरोधाकंना प्रत्यूत्तर दिलं आहे. एनसीआरबीच्या रिपोर्ट मध्ये एक. घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि क्रमवारी तसेच त्याचवेळी दुसरं म्हणजे तिथे आणखी एक आकडा असतो तो म्हणजे प्रतिलाख लोकसंख्येमागे किती गुन्हे घडले आहेत याची आकडेवारी. दरम्यान महाराष्ट्रात सरासरी ४ हजार मुली तर ६४ हजार महिला बेपत्ता होतात.

गुन्ह्यांच्या संदर्भात आकडेवारी पाहीली तर, २०२० मध्ये- ३ लाख ९४ हजार १७ एवेढे गुन्हे होते.
२०२२-२३ मध्ये – ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे आहेत. म्हणजेच २०२० च्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्हे २० हजाराने कमी झालेले आहेत.

बिहार, बंगालपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती चांगली असल्याचा ठाम विश्वास विधानसभेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत गुन्ह्याचं प्रमाण कमी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुली बेपत्ता होतात त्या मुली परत येण्याच प्रमाणही वाढलेलं आहे. तसेच आकडेवारीच्या जोरावर गुन्ह्यांचं विश्लेषण करण अयोग्य आहे. काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे तसेच आता नागपूरला crime city म्हणणं हे देखील चुकीचं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसेच सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहोत.

Winter session | महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले काही महत्वाचे मुद्दे-

  • महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत गुन्ह्यांच प्रमाण कमी.
  • मुंबईत रात्री बारा वाजता मुली सुरक्षित फिरू शकतात.
  • आकडेवारीच्या जोरावर गुन्ह्यांच विश्लेषण करण अयोग्य आहे.
  • महाराष्ट्रात सरासरी ४ हजार मुली तर ६४ हजार महिला बेपत्ता होतात.
  • महिला आणि मुली परत येण्याच परमानाही वाढलेलं आहे.

Chhagan Bhujbal | ‘महाराष्ट्र सदन घोटाळा’ प्रकरणी भुजबळ पुन्हा अडकणार..?

ललित पाटील प्रकरणावरून फडणवीसांचा विरोधकांना टोला

यावेळी बाोलताना फडणवीस म्हणाले की, मविआच्या काळात ललित पाटीलची कस्टडी घेण्यात आली नाही. तसेच २०२० साली ललित पाटीलचा ड्रग्ज कारखाना सुरु झाला. वेगवेळ्या प्रकारे त्याला कोणी आणि कशी मदत केली हे आम्हाला माहित आहे. आता आमली पदार्थांविरोधात आम्ही narco coordination centre (nco)ची स्थापना केली आहे. याचबराबर महाराष्ट्रात माराठा आदोलकांवरील ३२४ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here