Winter Session | नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session)आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज काही मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तब्बल ३७ लक्षवेधी ह्या मांडल्या जाणार आहे. तसेच, आज दोन्हीही सभागृहात विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे उत्तर देण्याचीही शक्यता आहे.
‘विदर्भ विकास’ ह्या संदर्भातील प्रस्तावावरही मुख्यमंत्री आज उत्तर देणार आहेत. ह्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter Session)अखेरच्या दिवशी विदर्भासाठी काही विशेष पॅकेज किंवा सवलतीची घोषणा होणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यावर संध्याकाळी सर्व विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होणार आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद होणार आहे.
२ दिवस वाढवण्यासाठी नकार |(Winter Session)
विधिमंडळाच्या ह्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा आणखी २ दिवसांनी वाढवला जावा, अशी विरोधी पक्षांची मागणी होती. पण विरोधकांच्या ह्या मागणीला केराची टोपली दाखवत राज्य सरकारने ठरल्याप्रमाणेच आजच हे हिवाळी अधिवेशन संपवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
winter session | फडणवीसांसमोर अजित दादांची माघार; मलिकांवरून जुंपली
अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून
दरम्यान, विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे २६ फेब्रुवारीपासून सुरु होत असून, २६ फेब्रुवारी पासून १ मार्च असे तब्बल चार दिवस हे संपूर्ण अधिवेशन चालणार आहे. दरम्यान, ह्या अधिवेशनात राज्याच्या अर्थसंकल्पासह मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचाही निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(Winter Session)
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन
राज्यात सध्या पेटलेला प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण असून, यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात यासंदर्भात विशेष अधिवेशन घेतले जाणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली आहे. क्युरेटिव्ह याचिकेत ज्या काही त्रुटी आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार असल्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा पुढील एक महिन्यात येणार असून, त्यानंतर फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावू असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. (Winter Session)
Winter Session | अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे कुटुंबाला घेरले
मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी येत्या फेब्रुवारीमध्ये एक विशेष अधिवेशन घेण्याची मोठी घोषणा काल विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असल्याची ग्वाही यावेळी शिंदेंनी दिली आहे. तर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबीयांनादेखील कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. (Winter Session)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम