winter session | फडणवीसांसमोर अजित दादांची माघार; मलिकांवरून जुंपली

0
26
winter session
winter session

winter session |  भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादीचे  नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात पत्र लिहिले होते. या पत्रानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. या पत्रावर विरोधकांच्याही प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. त्यानंतर आता अखेर अजित पवार यांनी मौन सोडले.(winter session)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यासंदर्भात गुरुवारी लेटरबॉम्ब टाकला होता. त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहिले असून, त्या पत्रात नवाब मलिक यांना महायुती सरकारमध्ये सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दर्शविला आहे.

त्यानंतर गुरुवारी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली होती. दरम्यान, आता स्वत: अजित पवार यांनी अखेर यासंदर्भात मौन सोडले आहे. नवाब मलिक यांच्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रावर आपण आपली भूमिका नवाब मलिक यांनी मत व्यक्त केल्यानंतर मांडणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी या विषयावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.(winter session)

Gold Silver Price | सोने-चांदीची ग्राहकांसाठी गुड न्यूज

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार

देवेंद्र फडणवीस यांचे पत्र हे आपणास मिळाले असून, आपण हे पत्र वाचले देखील आहे. नवाब मलिक हे पहिल्यांदाच आज सभागृहात आले. त्यांची भूमिका काय आहे, ते ऐकल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईल. फडणवीस यांच्या तया पत्रासंदर्भातील विषय हा नवाब मलिक यांनी त्यांचे मत व्यक्त केल्यानंतर आपण आपली प्रतिक्रिया मांडणार आहोत. नवाब मलिक यांच्या भूमिकेनंतर मी माझी तसेच पक्षाची भूमिका जाहीर करेल. आधी मलिकांचे मत काय आहे, ते स्पष्ट कळू द्या, असे यावेळी अजित पवार यांनी म्हटले.(winter session)

नवाब मलिक कुठे बसले

सभागृहात कोणी आणि कुठे बसावे, हा माझा अधिकारी नाहीये. तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. असे अजित पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडवणीस यांना पाठिंबा दिला आहे? त्यावर पुन्हा अजित पवार यांनी त्या पत्राबद्दल विचारले असता “मला जे करायचे ते मी करेल, हे उत्तर दिले. यावेळी माध्यमांनी सारखा तोच विषय लावून धरल्यावर अजित पवार पुन्हा चिडले. तुम्हाला अधिकार दिला म्हणजे तुम्ही कसेही वागणार का? असा प्रश्नही त्यांनी केला.(winter session)

Mumbai News | रुग्णालयाच्या बाथरूम मध्ये काढत होता मुलीचा ‘तसा’ व्हिडिओ

नेमकं काय प्रकरण..?

नवाब मलिक हे काही दिवसांपासून कारागृहामध्ये होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप असून, ते आजारपणावर उपचार करण्यासाठी सध्या जामिनावर बाहेर आलेले आहेत. त्यानंतर ते हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने गुरुवारी नागपुर येथे विधान भवनात आले. दरम्यान, ते विधानसभेत अजित पवार गटाच्या आमदारांसोबत जाऊन बसले.(winter session)

त्यानंतर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्याही कार्यालयात ते बसले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत न घेण्याबाबत पत्र लिहिले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना त्यांनी हे कथित पत्र लिहिले. त्यावर आता जोरदार राजकीय चर्चा सुरु आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here