Political update : गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित चव्हाण यांनी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडत शिंदे फडणवीस सरकार सोबत हात मिळवणी केली होती.मात्र यामुळे शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या 40 आमदारांना सोबत घेत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला, यात अजित पवार यांच्यासह आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ ही घेतली यामुळे शिंदे गटात नाराजी नाट्य सुरू झालं आहे. शिवसेनेमध्ये न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं होतं यावेळी जवळपास ४० हुन अधिक जणांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आणि शिवसेनेचा गट ब स्थापन झाला. मात्र आता अजित पवार 40 आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटात फूट पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. तर जवळपास 20 आमदारांनी पुन्हा मातोश्री वर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.Political update आजच हे वीस आमदार घर वापसी करणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे.
नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आपल्या गटातील आमदार खासदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पक्षांतर्गत सुरू असलेला असंतोष मिटवण्याचा व भविष्यातील आपली भूमिका स्पष्ट करण्याचा हेतू होता. मात्र या बैठकीदरम्यान जवळपास सर्वच आमदार आणि खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. Political updateराष्ट्रवादी सत्तेमध्ये आल्याने आपलं काय होईल अशी काळजी यावेळी व्यक्त करण्यात आली. तर एकनाथ शिंदे यांनी आपल्याला याचा कोणताही फरक पडणार नसल्याचा स्पष्ट केलं.
दरम्यान भाजपसोबत आपली युती ही वैचारिक पातळीवर झाली आहे. मात्र आता नव्याने झालेली युती केवळ राजकीय तडजोड असल्याचे म्हणत त्यांनी या युतीमुळे घराणेशाही संपुष्टात येईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच यामुळे आता ठाकरे व पवार या दोन कुटुंबांना बाजूला करत राज्याच्या विकासासाठी एकत्र आलेल्या लोकांचं हे सरकार असल्याचं त्यांनी सांगितलं असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच आवाहन देखील केलं. Political updateराज्यात आपली लोकप्रियता वाढत असल्याने आपण अशावेळी पक्ष वाढवण्यावर भर देण्याची गरज असल्याचं सांगत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मात्र तरीही शिंदे गटातील आमदार खासदारांमधील अस्वस्थता मिटली नसून यातील 20 जण फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
एकीकडे अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. ज्या राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणे शक्य नाही अस ठाम मत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला जवळ केलं. पण हा सगळा राजकीय भाग असला तरी मात्र शिंदे गटाचे पुढे काय? Political updateहोणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच राष्ट्रवादीच्या ज्या आठ नेत्यांनी शपथ घेतली ते सगळे दिग्गज व अनुभवी नेते आहेत. यामुळे यातील एखाद दोन नेते वगळता बाकी सर्वांकडे मोठीच खाती जाण्याची दाट शक्यता आणि भीती शिंदे गटाला आहे. यातच शिंदे आणि भाजप गटातील ज्या आमदारांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यांना कोणती खाती मिळतील याची अजूनही पुष्टी झालेली नाही. यामुळे अस्वस्थ असलेल्या शिंदे गटातील आमदारांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी खाते वाटपासाठी भाजपवर दबाव आणण्याचा आग्रह सर्वांकडून करण्यात आलाय. Political updateया बैठकीला मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, संजय शिरसाठ हे नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांपूर्वी शिंदे गटातील नेत्यांचं खातेवाटप पूर्ण व्हावं अशी भूमिका मांडली असल्याचे देखील समजत आहे. तर शिंदे गटातील २० जण आजच मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत असल्याने वीस जण नेमके कोण असणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम