Mumbai : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?

0
25

Mumbai : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी भावनिक साध मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घालण्यात आली आहे.

काल राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. यानंतर जवळपास सर्वच पक्षीय नेत्यांनी यावर भाष्य केलं होत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा आज सिंहासन सिनेमामधला दिपू टिपणीस झाला असं म्हणत राज्यातील राजकारणाचा चोथा झाला असल्याची टीका केली होती. यानंतर आज पक्ष कसा पुढे जाईल या संदर्भात मनसेची बैठक पार पडली. यावेळी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी साथ राज ठाकरेंना घातली आहे.

या बैठकीमध्ये पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसंदर्भात यावेळी चर्चा झाली. लोकसभा निवडणूक ताकदीने लढायची आहे यावर चर्चा झाली. तसंच ती कशी लढायची यावर राज ठाकरेंनी नेत्यांचं मत जाणून घेतलं आहे.

 

यावेळी काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये आपण उद्धव ठाकरेंसोबत जावं असं मत बैठकीदरम्यान व्यक्त केला आहे. यादी 2017 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका दरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला नसल्याचे बघायला मिळालं होतं. मात्र आता महाराष्ट्राची व मराठी माणसांची अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी जनभावना असल्याचं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आणि त्यामुळे आता आगामी निवडणुकांमध्ये राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणार का अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आल आहे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here