मलिकांना जामीन मिळणार कि पुन्हा कोठडी मध्ये रवानगी करावी लागणार?

0
49

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, आणि त्यांनतर त्यांना अटक करण्यात आली होती. गोवावाला कंपाऊंड जमीन खरेदीमध्ये मनी लॉड्रिंग केल्याचा नवाब मलिकांवर गुन्हा दाखल केला होता. दाऊद इब्राहिमच्या टोळीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप मालिकांवर होता. दहशतवादाला आर्थिक पाठबळ दिल्याप्रकरणी त्यांच्या वर गंभीर आरोप करण्यात आला होता.

तुरुंगात रवानगी केल्या नंतर तब्बेतीच्या कारणामुळे मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यात इस्पितळात उपचार चालू आहेत. आज मुंबईच्या सत्र न्यायालयात मलिकांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. याआधीही मलिकांनी जामिनासाठी अर्ज केला होता पण न्यायालयाकडून तो अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र आज च्या सुनावणी मध्ये मलिकांना जामीन मिळणार कि पुन्हा त्यांना कोठडी मध्ये रवानगी करावी लागणार हे समजेल. आज ११ वाजता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here