मुंबईत पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नागरिकांची मोठी गर्दी

0
1

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. आज मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचा बोरीवली ते दहीसर स्टेशन दरम्यान आ पहाटेपासून खोळंबा झाला आहे. तांत्रिक कारणामुळे झालेल्या बिघाडामुळे मुंबई लोकल काही वेळ उशिरा धावत आहे.

पश्चिम रेल्वे बोरिवली दहिसर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हा बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून हा बिघाड झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे.त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुंबईकरांना मनस्थाप सहन करावा लागत आहे.

पश्चिम रेल्वे दरम्यान ट्रॅक वरील गाड्या या गाड्या स्लो ट्रॅकवरून वळवण्यात आल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. त्यासोबतच विरार, वसई, नालासोपारा या स्थानकांतही प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अद्याप लोकल सेवा पूर्ववत झालेली नाही. लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here