West Bengal Train Accident | भीषण रेल्वे दुर्घटना..! मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक अनेक प्रवासी जखमी

0
32
West Bengal Train Accident
West Bengal Train Accident

कोलकाता :  देशाला हादरवणारा भीषण रेल्वे अपघात पश्चिम बंगालमध्ये झाला असून, पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी येथे कंचनजंगा एक्स्प्रेस (Kanchenjunga Express train) ही सियालवाहकडे जात असताना रेल्वे आणि मालगाडीची धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात पॅसेंजर रेल्वेचे काही डब्बे हे रुळावरुन घसरले असून, समोर आलेल्या माहितीनुसार, या रेल्वे अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, आपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Train Accident |भीषण अपघात..! मालगाडी वर पूलावरून कोसळली कार

बचाव पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू 

दरम्यान, रेल्वे अपघाताची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत “पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताची माहिती ऐकून धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा या भागात कांचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. सध्या या घटनास्थळी मदत व बचाव पथकांनी बचावकार्य सुरू केले असून, बचाव पथक, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका, पोलीस व आपत्ती पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. युद्धपातळीवर कारवाई सुरू केली असल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

Army vehicle accident | जबलपूरजवळ सैन्य दलाच्या गाडीला भीषण अपघात

West Bengal Train Accident | नेमकं काय घडलं?

सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात कंचनजंगा एक्स्प्रेस ही सियालवाहच्या दिशेने जात असताना पॅसेंजर रेल्वे आणि कंचनजंगा एक्स्प्रेस यांची धडक झाली आणि हा अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की कंचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरुन खाली घसरले. तर, कंचनजंगा एक्स्प्रेस मालगाडीला जाऊन धडकली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here