Weather Update | नुकताच राज्याच्या काही भागात अवकाळी आणि गारपीटीने शेतकऱ्यांना हतबल केलेलं आहे. त्यातच आता यंदाच्या हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीची किंवा थंडीच्या लाटांची शक्यता तशी कमी आहे. कडाक्याची थंडी पडलीच तर ती फार कमी काळासाठी असेल. शिवाय डिसेंबर महिन्यात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी व्यक्त केलेला आहे.
Uttarkashi Tunnel Rescue | ‘त्या’ मजुरांवर ही जीवघेणी परिस्थिती का ओढवली?
शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. महापात्रा म्हणाले की, यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात कडाक्याची थंडी पडण्याची किंवा थंड लाटांची शक्यता कमी आहे. कडाक्याची थंडी पडलीच तर ती फार कमी काळासाठी असेल. डिसेंबर महिन्यात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहु शकते. महाराष्ट्रातदेखील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. यंदाचा नोव्हेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरलेला आहे. डिसेंबर महिनाही सरासरीपेक्षा उष्ण राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे सोमवारी (दि. 03) डिसेंबर रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. (Weather Update)
हे चक्रीवादळ ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्याकडे झेपावणार आहे. त्यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच या चक्रीवादळाचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता नाहीय. विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान ढगाळ राहण्याची आणि हवेत आर्द्रार्तचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे.
Crime News | पत्नीसह मुलालाही संपवलं; बिझनेसमनच्या घरात मृत्यूचं तांडव
यंदाचे हे वर्ष सर्वाधिक उष्ण
यंदाचे वर्ष हवामान शास्त्राच्या 174 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक उष्ण ठरण्याचा अंदाज आहे. 1850 ते 1900 या काळातील (Weather Update) सरासरी तापमानाच्या तुलनेत यंदा जागतिक तापमानात सुमारे 1.40 अंशाने वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष आजवरचे सर्वात उष्ण वर्ष ठरणार आहे.
एल-निनो निष्क्रिय होणार; पुढील पावसाळ्यावर परिणाम नाही
प्रशांत महासागरात सक्रिय असणाऱ्या एल-निनो या हवामान विषयक प्रणालीने जगात हाहाकार माजविलेला आहे. तापमान वाढ, दुष्काळ, अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना जगाला करावा लागतो आहे. अन्नधान्य उत्पादनात होणाऱ्या संभाव्य घटीचा सामना कसा करायचा? असा प्रश्न जगाला भेडसावत आहे. ती एल-निनो प्रणाली डिसेंबर अखेर सक्रीय राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी 2024 नंतर एल-निनो निष्क्रीय होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकतो. त्यामुळे 2024च्या मोसमी पावसाच्या हंगामावर एल-निनोचा कोणताही परिणाम असणार नाही. या काळात हिंद महासागरीय द्वि- धुविता (इंडियन ओशन डायपोल) ही निष्क्रीय होऊ शकतो, अशी माहितीही डॉ. महापात्रा यांनी दिली. (Weather Update)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम