Nashik News| नाशिकहून जायकवडीला पाणी सोडणार; पाणी संघर्ष पेटणार..?

0
53

Nashik News|  नाशिक व अहमदनगर  जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात सुमारे ८.७ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. यात नाशिकच्या गंगापूर धरणातून ०.५  टीएमसी, तर दारणा धरण समूहातून २ हजार ६४३ टीएमसी प्रमाणे पाणी सोडले जाणार आहे. एकतर, नाशिक जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी झाला असून दुष्काळसदृश्य  स्थिती असताना जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या ह्या निर्णयाला नाशिकच्या जनतेचा व शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. 

नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या ६७.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. धरणे भरलेली असली तरीही तलाव व विहिरींचा पाणी साठा कमी झाल्यानंतर पिण्याच्या पण्याचाही प्रश्न उभा राहणार आहे. पाऊस वेळेवर झाला नसल्यामुळे खरिपाची पिकेही धोक्यात आली आहेत. अशातच आता नाशिकहून जायकवाडी धरणात पाणी सोडले जाणार आहे. गंगापूर धरण समूहातून तसेच दारणा धरण समूहातून ३१ ऑक्टोबरला पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आयला आहे. पण,  यासाठी आता शेतकऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. (Nashik News)

Onion Price| सरकारचा पुन्हा कांदा उत्पादकांन विरोधात मोठा निर्णय; कांद्याचे दर पुन्हा पडणार..?

अनेक दिवसांपासूनच मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू होत्या. यासाठी १७ आक्टोबरला छत्रपती संभाजीनगर येथे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बैठक झाली. दरम्यान, मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा असल्याने त्यावेळी आंदोलन व विरोध टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला नव्हता. पण,आता या संदर्भात थेट आदेशच जाहीर करण्यात आला आहे. पण, जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिककरांचा विरोध असून, यामुळे नाशिक, अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा पाणीसंघर्ष होण्याची शक्यता आहे.

पाणी सोडण्याला विरोध

नाशिक नगरच्या धरण समूहातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशांनुसार नाशिक नगरमधून ८.६०३ TMC पाणी सोडले जाणार आहे.पण, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील तालुकयांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती असताना जायकवाडीला पाणी का सोडले जात आहे?. हा सवाल नाशिकचे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जायकवाडी धरणात ६५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यातून ८.६०३ TMC पाणी सोडले जात आहे. पण, या निर्णयाला विरोध होत असून, याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू आहे.(Nashik News)

Crime News | प्रेमीयुगुलांनी एकत्रच संपवलं जीवन! वाघोलीत लॉजवर घडली धक्कादायक घटना


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here