Water Reduction | नाशिककरांना पावसाची प्रतिक्षा; केवळ महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा

0
39
Water Reduction
Water Reduction

नाशिक :  राज्यात वेळेआधीच पावसाने हजेरी लावली असली. तरीही नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट काय असून, अद्यापही नाशिककरांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. यांचे कारण म्हणजे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठला असून, आता धरणात केवळ पुढील महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने (Rain) हजेरी लावली असून, ग्रामीण भागात यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसानही झाले आहे. मात्र, असे असले तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस न झाल्याने नाशिककरांची चिंता वाढली असून, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ पुढील २८ दिवस पुरेल एवढेच पाणीसाठी आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात येत्या आठ दिवसांत पावसाचा जोर वाढला नाहीतर नाशिककरांना निश्चितच पाणी कपातीला (Water Reduction) सामोरे जावे लागू शकते.

Nashik News | नाशिककरांनो सावधान..! डेंग्यूच्या रुग्णांची संख्या शंभरी पार; तर, स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले

महापालिकेच्या आरक्षित पाणी साठ्यात कपात

नाशिक शहराला गंगापूर धरण (Gangapur Dam), मुकणे (Mukne Dam) आणि दारणा (Darna Dam) या तीन धरणांतून पाणी पुरवठा (Water Supply) होतो. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने नाशिकमधील या धारणांतून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) ८.६ टीएमसी पाणी सोडल्यामुळे नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आरक्षित पाणी साठ्यात कपात करण्यात आली असून, ६ हजार १०० दशलक्ष घनफुट पाण्याची मागणी असताना तिन्ही धरणं मिळून नाशिक महापालिकेला केवळ ५ हजार ३१४ दशलक्ष घनफुट इतकेच पाणी आरक्षित करण्यात आले.

Nashik Rain Update | नाशिकमध्ये एक तासाच्या पावसातच उड्डाण पुलावरून कोसळले धबधबे

Water Reduction |  गंगापूर धरणात १९ % पाणीसाठा 

दरम्यान, ५ हजार ३१४ दशलक्ष घनफुट पाणी नाशिक महापालिकेला आरक्षित करण्यात आले असून, त्यापैकी केवळ ५४८ दशलक्ष घनफुट इतकेच पाणी शिल्लक आहे. शहरासाठी रोज १९.५६ दशलक्ष घनफुट पाणी पुरवठा होत असल्याने आकडेमोड पाहता शिल्लक पाणीसाठा हा केवळ २८ दिवस पुरेल इतकाच असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता नाशिककरांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. तरी गंगापूर धरणात सध्या केवळ १९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here