Political news | संजय राऊत अब्रुनुकसानी प्रकरणी राणे यांच्याविरोधात कोर्टाकडून वॉरंट

0
43

Political news |  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानी दावा प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आमदार नितेश राणे यांना माझगाव कोर्टाने सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

मात्र, माझगाव कोर्टाने समन्स बजावल्यानंतरदेखील नितेश राणे हे सुनावणीला हजर राहिले नाही. त्यानंतर माझगाव कोर्टाकडून नितेश राणे यांच्याविरोधात आता बेलेबल वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना कोर्टात उपस्थित राहूनच जामीन घ्यावा लागणार आहे.

दरम्यान, नितेश राणे यांच्याकडून ७ मे रोजी एक वक्तव्य करण्यात आलं होतं. येत्या १० जूनपर्यंत संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षात प्रवेश करतील, असं राणे म्हटले होते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. याप्रकरणी, आता माझगाव कोर्टाने नितेश राणे यांना वॉरंट जारी केले असल्याची माहिती समोर आली होते.

Info-tech news | फोनपेक्षाही स्वस्त किंमतीत जिओचा नवा लॅपटॉप

राणे यांच्याविरोधात वॉरंट

दरम्यान, आता दुसरीकडे नितेश राणे यांनी कोर्टाकडून बजावण्यात आलेलं हे समन्स आपल्यापर्यंत पोहोचलेलंच नाही, असं सांगितलं आहे. नितेश राणे यांनी आज कोर्टात हजर राहणं हे आवश्यक होतं.

पण, ते जारी कोर्टात हजर राहिले नाही तरी त्यांच्या वकिलांकडून उत्तर देणं अपेक्षित होतं. मात्र तसं काहीच झालेलं नाही. त्यामुळे कोर्टाने राणे यांच्याविरोधात आता थेट बेलेबल वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आता राणे यांना कोर्टात उपस्थित राहूनच जामीन घ्यावा लागणार आहे.

Breaking news | मराठवाडा-नाशिक पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here