ट्विटरवर विराटचे ५ कोटी फॉलोअर्स; बनला सर्वाधिक फॉलोअर्स असलेला पहिला क्रिकेटपटू

0
13

मुंबई – टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे ट्विटरवर सुमारे ५ कोटी (५० मिलिअन) फॉलोअर्स झाले आहेत. यासोबतच तो ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा जगातला पहिला क्रिकेटपटू बनला आहे. जगातील अन्य खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे.

तसेच, कोहली ट्विटर अकाऊंट पंतप्रधान कार्यालय, नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे तिसरे सर्वाधिक फॉलोअर्स असलेले भारतीय ट्विटर अकाऊंट ठरलेले आहे. कोहलीने सचिन तेंडुलकरलादेखील याबाबतीत मागे टाकले असून या प्लॅटफॉर्मवर सचिनचे ३.७ कोटी (३७.८ मिलिअन) फॉलोवर्स आहेत.

जगातील ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्सच्या यादीत विराट कोहली चौथा खेळाडू आहे. या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर असून त्याचे १० कोटी (१०३.४ मिलिअन) फॉलोवर्स आहेत. त्यानंतर नेमारचा (५.७९ कोटी) क्रमांक लागतो तर बॉस्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (५.२२ कोटी) यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पण जर भारतीय ट्विटर अकाऊंट विचार केला, तर भारताचे पंतप्रधान कार्यालय (PMO) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंट नंतर विराट कोहलीचा नंबर लागतो. कारण, पीएमओ अकाऊंटचे तब्बल ५ कोटी (५०.५ मिलिअन) फॉलोअर्स, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंटवर ८२ कोटीपेक्षा जास्त (८२.४ मिलिअन) फॉलोअर्स आहेत.

तब्बल १००० दिवसांहून जास्त दिवसांनी ठोकले विराटने शतक

विराटने यंदाच्या आशिया चषकात तब्बल १०२० दिवसांनी शतक ठोकले आहे. त्याने अफगाणिस्तानविरोधात १२२ धावांची खेळी करत आपले टी२० तील पहिले व कारकिर्दीतले ७१वे शतक साजरे केले. गेल्या ३ वर्षांपासून आउट ऑफ फॉर्म चाललेला कोहलीने यंदा दमदार कमबॅक करत त्याने १ शतक व २ अर्धशतकासह स्पर्धेत २७६ धावा केल्या. त्यामुळे तो सर्वाधिक रन काढण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here