Skip to content

तब्बल ७० वर्षांनी भारतात दिसणार चित्ते; नामिबियातून ८ चित्ते भारतात आणणार


नवी दिल्ली – देशात तब्बल ७० वर्षांनी चित्त्यांचे दर्शन होणार आहे. कारण, ‘प्रोजेक्ट चित्ता’ अंतर्गत नामिबियातून भारतात ८ चित्ते दाखल होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला हे चित्ते भारतात दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीत हे चित्ते मध्यप्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ह्या चित्यांना भारतात आणण्यासाठी खास जम्बोजेट विमान नामिबियात पोहोचले आहे.

नामिबियामधील विंडहोक येथील भारतीय उच्चयुक्तालयाने हा फोटो ट्विट केला असून वाघांच्या भूमित सदिच्छा घेऊन जाण्यासाठी शुरांच्या भूमित एक खास पक्षी उतरला, असे ट्विटदेखील त्यांनी केली आहे. ह्या प्रोजेक्टतंर्गत देशात १६ चित्ते येणार असून त्यातील ८ चित्ते सध्या येणार आहे

याआधी १९५२ साली भारतातून चित्ता नामशेष झाल्यानंतर १९७१ मध्ये इंदिरा गांधींनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती, मात्र त्यात अपयश आल्यानंतर पुन्हा २००९ मध्ये याबाबत हालचाली सुरु झाल्या. तेव्हा मात्र, २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टाने बंदी घातली होती. आता सात वर्षांनी २०२० मध्ये बंदी उठवल्यानंतर चित्यांना प्रायोगिक तत्वावर भारतात आणण्याची परवानगी मिळाली व हे चित्ते भारतात दाखल होणार आहे. त्यामुळे तब्बल ७० वर्षांनी चित्ते पुन्हा भारतात दिसणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!