Viral news | बटाट्याच्या नादात स्वतःचेच लग्नच विसरला नवरदेव

0
63
Viral news
Viral news

Viral news |  आता लग्नसराईला सुरुवात झालेली असून, देशभरात गावागावात तसेच प्रत्येक शहरांमध्ये हे लग्नसमारंभ जोरदार गाजावाजात पार पडत आहेत. लग्न म्हटलं की, सालीकडे फक्त उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण असते, घरी अनेक पाहुण्यांचे रेलचेल सुरू असते.(Viral news)

गाजतवाजत बँडबाजा ही असतो. तसेच लग्न हे वेळेवरच व्हावे यासाठी वऱ्हाडीदेखील घाईघाईत लग्न स्थळी मंडपात पोहोचतात. पण, ह्याच लग्नसारीत आता एक विचित्रच घटना समोर आलेली आहे. दरम्यान, ह्या लग्नात नवरदेव हा चक्क बटाट्याच्या नादात आपले लग्नच विसरुन गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.(Viral news)

समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तरप्रदेश मधील इटावा येथील समसपुरा मुडैना येथील एका मुलीचा विवाह हा ५ डिसेंबर रोजी होता. पण, ह्या लग्न मंडपात नवरदेवच पोहोचला नाही. मुख्यमंत्री सामूहिक विवाह ह्या योजनेच्या अंतर्गत होणाऱ्या ह्या लग्नात नवरदेव पोहोचलाच नाही व वधू तसेच सर्व नातेवाईक हे नवरदेवाची वाट बघता थकले.(Viral news)

MLA Disqualification | एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी विश्वासुंनीच केल्या होत्या सह्या..?

हा नवरदेव लग्न मंडपात पोहोचला नसल्याने वधूचे कुटुंबीय हे प्रचंड नाराज झाले आणि ते रागाच्या भरात थेट नवरदेवाच्या घरी दाखल झाले. आणि नंतर ह्या घटनेचा तपास केला असता, नवरदेव हा बटाटे विकण्यासाठी कानपूर येथे गेल्याचं कारण समोर आलं. तसेच तेथून परतण्यासाठी ह्या नवरदेवाला उशीर झाला आणि त्यामुळे नवरदेव हा लग्न मंडपात पोहोचू शकलाच नाही. दरम्यान, या नंतर वधूच्या कुटुंबीयांनी मिळून ह्या नवरदेवासोबत चक्क एक अ‍ॅग्रीमेंटच केलं आहे.(Viral news)

वधूच्या कुटुंबीयांनी नवरदेवासोबत तहसील कार्यालय येथे जाऊन एक अ‍ॅग्रीमेंट तयार केलेलं असुन, ह्या करारानुसार वर आणि वधू यांच्या मध्ये एक अ‍ॅग्रीमेंट झालेले आहे. आणि या अ‍ॅग्रीमेंटनुसार, आता ह्या वधू आणि वर यांचे येत्या फेब्रुवारी महिन्यात लग्न पार पडणार आहे. लग्नाच्या संदर्भातील ह्या स्टॅम्प पेपरवरील अ‍ॅग्रीमेंटची सध्या सर्वत्रच चर्चा होत आहे.

Child Marriage | पोलिस झाले वऱ्हाडी; समजूत काढत बालविवाह रोखला

दरम्यान, आता हे लग्न येत्या फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. ह्या मुलीच्या कुटुंबीयांना संशय होता की, मुलगा हा लग्नासाठी नंतर नकार तर देणार नाही ना? तसेच याच कारणामुळे हा करार दोन्ही वर-वधू ह्या दोन्ही पक्षांतर्फे करण्यात आला आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यात हा मुलगा लग्नाला गैरहजर राहू नये म्हणून करारनामा केल्याचे नातेवाइकांनी सांगितले आहे.(Viral news)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here