Villages Encroachment : राज्य राज्यांमधील सीमावाद नेहमीच समोर येत असतात मात्र आता गुजरातने महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या असलेल्या काही गावांवर अतिक्रमण केले असल्याचा दावा केल्यामुळे नवा संघर्ष निर्माण झाला आहे.
मागील वर्षी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादामुळे राज्यातील वातावरण चांगलं तापलं होतं. या गोष्टीला वर्ष उलटत नाही तोच आता पुन्हा एकदा यात नवीन ठिणगी पडली आहे. महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील काही गावांनी गुजरात द्वारे झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा पुढे करत गुजरात ने महाराष्ट्रातील सीमेवर असलेल्या गावांवर अतिक्रमण केल्याचा दावा केला आहे.(Villages Encroachment)
https://thepointnow.in/har-ghar-tiranga-2/
गुजरात राज्यातील उंबरगाव येथील सोलसुंबा या ग्रामपंचायतीने महाराष्ट्रामधील वेवजी ग्रामपंचायत मध्ये जवळपास दीड किलोमीटर पर्यंतच अतिक्रमण केल असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला होता. हा मुद्दा माकपचे आमदार विनोद निकोले यांनी लक्षवेधी द्वारे उपस्थित केला आणि यानंतर प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने याची दखल घेत कामाला सुरुवात केली. यामध्ये वेवजी गावामध्ये गुजरातच्या ग्रामपंचायतीने काम केलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(Villages Encroachment)
सोलसुंबा ग्रामपंचायत ने महाराष्ट्राच्या ऐवजी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये स्ट्रीट लाईट बसवण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांना परवानगी देण्यात आली. मात्र गुजरातच्या ग्रामपंचायतीने या ठिकाणच्या स्ट्रीट लाईटच काम केलं आहे. विधानसभेमध्ये आमदार निकोले यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सोलसुंबा गावाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. तसेच शासनाला या भागातील सीमांकन करण्यासाठी पत्र देखील देण्यात आल्या असून पुढील गोष्टींचा पाठपुरावा करण्यात येत असल्याचं ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सांगितला आहे. तसेच गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील अनेक व्यवहार हे दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांवर चालत असल्याचा देखील सांगण्यात आल आहे.(Villages Encroachment)
गुजरात मधील सोलसुंबा ग्रामपंचायत ने बेकायदेशीर रित्या दीड किलोमीटर पर्यंत पथदीप लावून घुसखोरी केल्यामुळे ऐवजी ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केला आणि यामुळे पुन्हा एकदा सीमावाद समोर आला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमा स्पष्ट करण्यात याव्या, यामध्ये सुसूत्रता आणण्यात यावी, दोन राज्यांच्या सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना विना तक्रार प्रवास करता यावा, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आदान प्रदान होण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवरील ग्रामपंचायती आणि प्रशासनाने एकत्रितपणे हे प्रश्न मार्गी लावणे गरजेचे असल्याच ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
कोरोना काळात देखील गुजरात राज्याची हद्द सुरू असा असे असलेला फलक पाचशे मीटर आधीच लावण्यात आला होता. आणि स्ट्रीट लाईटही बसवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना काळामध्ये राज्याच्या सीमा बंद असताना देखील याचा मोठा फटका स्थानिकांना बसला होता. या भागाच सीमांकन निश्चित नसल्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये नवीन संघर्षाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे.(Villages Encroachment)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम