Coal Scam: माजी खासदार विजय दर्डा कोळसा घोटाळ्यात दोषी

0
42

Coal Scam:  छत्तीसगड  कोळसा खाण वाटप घोटाळ्यात दिल्ली न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि मुलासह सात जणांना दोषी सिद्ध केलं आहे.

Sambhaji bhide : संभाजी भिडेंना संभाजी ब्रिगेडचा विरोध का?

छत्तीसगड कोळसा खाण वाटपात झालेल्या घोटाळ्यात दिल्लीतील विशेष न्यायालयानं राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांच्यासह सात जणांना दोषी ठरवलं. या प्रकरणावर आता १८ जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

Blood letter : राजकीय अस्थिरता नको महिला अत्याचारावर चर्चा करत त्या तरुणाने लिहिलं रक्ताने पत्र

विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांच्या खंडपीठात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायाधीशांनी निर्णय दिला. त्यात माजी कोळसा खात्याचे माजी सचिव एच के गुप्ता यांच्यासह सात जणांना दोषी करार दिलं. छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपात अनियमितता आली होती त्यामुळे हे सिद्ध झालं आहे.

दोषींमध्ये माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, एच के गुप्ता यांच्यासह के एस क्रोफा आणि के सी सामरिया, मेसर्स जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आणि या कंपनीचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांचा समावेश आहे.

गुन्हेगारी कट रचणे (आयपीसीच्या १२० बी अंतर्गत शिक्षापात्र), फसवणूक (आयपीसीच्या कलम ४२० नुसार शिक्षापात्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित  कलमांखाली त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणावरील शिक्षेची पुढील सुनावणी १८ जुलै रोजी होणार आहे.

वरिष्ठ सरकारी वकील ए. पी सिंग यांनी सादर केलेले निवेदन न्यायालयाने स्वीकारले. या प्रकरणातील सर्व वाजवी शंकांचे निरसन करण्याची क्षमता सीबीआयकडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

२० नोव्हेंबर २०१४ मध्ये सीबीआयनं सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यास न्यायालयानं नकार दिला होता व पुढील चौकशी करण्याचे आदेश दिले होते. लोकमत समूहाचे अध्यक्ष असलेल्या माजी खासदार विजय दर्डा यांनी एका पत्राद्वारे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोळसा मंत्रालयाविषयी दिशाभूल करणारी माहिती दिली होती. त्यावेळी हे खातं पंतप्रधानांच्या अखत्यारीत होतं. छत्तीसगडमधील फतेहपूर (पूर्व) येथील कोळसा खाण जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला मिळावी या उद्देशानं विजय दर्डा यांनी हे सगळं केलं होतं, असंही न्यायालयानं नमूद केलं होतं.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here