Vidhansabha Election | महाविकास आघाडीत बिनसलं..?; काँग्रेसचीही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी

0
87
Vidhansabha Election
Vidhansabha Election

Nana Patole :  हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असल्याने लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) वारे शांत झाले. तोच आता राज्यातील चार मतदार संघांमध्ये शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक झाल्यानंतर लगेच ३-४ महिन्यांत विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) बिगुल वाजण्याची शक्यता आहे. या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मागे टाकत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केल्याने जनतेचा कौल  हा महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, विधानसभेपूर्वीच आता आघाडीत बिघाडी होते की काय..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याचे कारणही तसेच कारण एकीकडे उद्धव ठाकरे हे स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही भंडारा येथे बोलताना काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असून, २८८ जागांवर लढण्याची तयारी सुरु असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. (Vidhansabha Election)

Maharashtra Elections | विधानपरिषदेतच महायुतीत फुट..?; मनसे विरुद्ध भाजप लढतीची घोषणा

राज्यात सगळीकडे आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  मी साकोली येथील आमदार असल्यामुळे स्वाभाविक आहे की मला येथे यावंच लागतं. येथील लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात आणि त्यांचे प्रश्नही सोडवावे लागतात. पण राज्यात २८८ जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत फुट पडणार का..? खरंच काँग्रेस आणि ठाकरे गट स्वबळावर निवणूक लढवणार का..? हे पहावे लागणार आहे.

Vidhansabha Election |  विधानसभेची तयारी; बैठकांचा सपाटा  

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यांच्या साकोली या विधानसभा मतदारसंघात असलेल्या त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. ते जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.  विधानसभेबाबत त्यांना विचारण्यत आलं असता त्यांनी साकोलीच नाहीतर, महाराष्ट्रातील सर्वच २८८ जागांवर विधानसभेची तयारी काँग्रेस करत असल्याचे सांगितले आहे. (Vidhansabha Election)

Raj Thackeray | मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार..?; राज ठाकरेंनी जाहीर केलं

ठाकरे गटाचीही २८८ जागा लढवण्याची भाषा..?  

दरम्यान, एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख देखील उद्धव ठाकरे यांनीही येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले होते. यावरून आता शिवसेना ठाकरे गटही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर आता शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीतही सांगलीच्या जागेवरुन उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये वाद झाले होते. यावरुन महाविकास आघाडीच्या या दोन्ही पक्षांत बिनसल्याची चर्चा सुरू होती.  (Vidhansabha Election)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here