VidhanSabha Election | मुंबई : राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांचे निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर दौरे सुरू आहेत. यातच आता विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य तारखा समोर आल्या असून, दिवाळीनंतर विधानसभेचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय संघर्षानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे सपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर फॉममध्ये असलेली महाविकास आघाडी की पुन्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज असलेली महायुती (Mahayuti)कोण बाजी मारणार हे पाहणे मोठे औत्सुक्याचे असणार आहे.
Vidhansabha Election | शरद पवारांचा डाव..!; बारामतीसह ‘या’ मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी मैदानात..?
VidhanSabha Election | विधानसभा निवडणुकीची तारीख कधी..?
मात्र, विधानसभा निवडणूक कधी होणार, मतदान आणि मतमोजणी कधी होणार..? याबाबतही रजयंतील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. यातच समोर आलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक (VidhanSabha Election 2024) ही ऑक्टोबर महिन्यात नाहीतर दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याची माहिती आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच दिवाळी असल्याने दिवाळीनंतर दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते. तर, साधारण 14 किंवा 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीचा निकालदेखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर 45 दिवसांनी नवीन विधानसभा स्थापन होणे गरजेचे असते. त्यानुसार जर निवडणूक आयोगाने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले. तर, त्यानुसार साधारण 12 ऑक्टोबरच्या जवळपास निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होईल आणि लगेच आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर 45 दिवसांचा आचारसंहितेचा कालावधी गृहित धरला तर 26 नोव्हेंबरपूर्वी नवीन विधानसभा स्थापन होऊ शकते.
Nashik Vidhansabha | युवा पिढीलाही आमदारकीचे डोहाळे; नाशिकमधील ‘या’ मतदारसंघांत बाप-लेकातच लढत..?
ऑक्टोबर महिन्यात निवडणूक का नाही..?
काही दिवसांपूर्वी 20 सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागेल, असे बोलले जात होते. तसे झाले असते तर विधानसभा निवडणुक ही दिवाळीच्या आधी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या असत्या. मात्र, त्यासाठी निवडणूक आयोगाची तशी कोणतीही हालचाल सुरू असल्याचे दिसत नाही. आचारसंहितेपूर्वी प्रस्ताव आणि फाईल्स मंजुरी, निर्णयांचा झपाटा वाढतो आणि वेगात काम सुरु होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निवडणूकीची शक्यता कमीच आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम