Vidhansabha Election | शरद पवारांचा डाव..!; बारामतीसह ‘या’ मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी मैदानात..?

0
57
Vidhansabha Election
Vidhansabha Election

Vidhansabha Election |  राज्याच्या राजकारणात सध्या काय होईल काहीच सांगता येत नाही. राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्यात काका विरुद्ध पुतण्या असे समीकरण पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे ४० आमदार हे अजित पवारांसोबत महायुतीत सामील झाले. शरद पवारांकडे उमेदवार नाहीत, असे बोलले जात असताना शरद पवारांनी लोकसभेला आपली ताकद दाखवली आणि महायुतीला राज्यात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

दरम्यान, यानंतर आता शरद पवारांकडून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना आणि विशेषतः युवा पिढीला शरद पवार गटाकडून संधी दिली जाणार आहे. बारामतीत अजित पवारांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेत ननंद विरुद्ध भावजय अशी लढत झाल्यानंतर आता बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगणार असल्याचे दिसत आहे. (Vidhansabha Election)

Vidhan Sabha Election | नाशकात आघाडीत बिघाडी..?; ठाकरे गटाच्या उमेदवारांना काँग्रेस, शरद पवार गटाचा विरोध

बारामतीसह ‘या’ मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी..? 

केवळ बारामतीतच नाहीतर शरद पवारांनी आणखी एका मतदार संघात आपला राजकीय डाव टाकला असून, सिंदखेडराजा या मतदार संघातही आगामी विधानसभेला काका विरुद्ध पुतणी असा संघर्ष पहायला मिळू शकतो. सिंदखेडराजा विधानसभेत गेल्या 25 वर्षांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr Rajendra Shingne) हेच आमदार आहेत. मात्रआता आगामी विधानसभेसाठी शिंगणे यांची पुतणी शरद पवार गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे (Gayatri Shingne) या उभ्या राहिल्या आहेत.  (Vidhansabha Election)

Vidhansabha Election | शरद पवार गट विधानसभेच्या ‘या’ ६ जागा लढवणार..?

Vidhansabha Election | शरद पवारांकडून गायत्री शिंगणे यांना बळ

बंडानंतर डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांसोबत गेले. हा मतदारसंघ गेल्या २५ वर्षापासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि राजेंद्र शिंगणे यांच्या महायुतीत जण्याने या भागात झालेली पक्षाची पडझड रोखण्यासाठी शरद पवार यांनी त्यांचीच पुतणी असलेल्या गायत्री शिंगणे यांना बळ दिले असून, त्यांच्याकडून आगामी निवडणुकीसाठी तयारीही सुरू आहे. दरम्यान, एकूण परिस्थिती पाहता सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात काका विरुद्ध पुतणी असा संघर्ष पुढील काळात पहायला मिळू शकतो. (Vidhansabha Election)

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा 

२५ वर्षांपासून आमदार असूनही तालुक्यात विकास झालेला नाही, असा आरोप करत गायत्री शिंगणे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. पिक विमा, पिक कर्ज, नुकसान भरपाई या मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आला होता. तर, यामुळे पुतणीनेच काका विरोधात रणशिंग फुंकले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here