Vidhanparishad Election | सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू असून, ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र, या निवडणुकांच्या तोफा थंडावतात. तोच निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यात चार जागांसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांत विधानपरिषदेच्या निवणुका (Vidhanparishad Election) होणार आहेत.
दरम्यान, शिक्षक आणि पदवीधर संघाच्या निवडणुकांसाठी ठाकरे (Shiv Sena) गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून, यापैकी काही नावे समोर आली आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे.
Teachers and Graduates Election | विधानपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला
अनिल परब, वरूण सरदेसाई रिंगणात..?
यापैकी मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब (Anil Parab), वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर, मुंबई शिक्षक मतदार संघासाठी ज. मो. अभ्यंकर व कोकण पदवीधर मतदारसंघासाठी किशोर जैन यांची नावे समोर आली आहे.
मुंबई पदवीधर आणि शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदार संघ या चार जागांवर निवडणुका १० जून रोजी होणार असून, २२ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने कंबर कसली असून, उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. सध्या मुंबई पदवीधर मतदारसंघांतून विलास पोतनीस हे आमदार आहेत. मात्र, आता त्यांच्याऐवजी विधान परिषदेचे (Vidhanparishad Election) आमदार अनिल परब यांना ठाकरे गटाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे.
आमदार महेश शिंदे यांचे कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बहुतांशी ग्रामपंचायतवर वर्चस्व
Vidhanparishad Election | या उमेदवारांची नावं निश्चित..?
२७ जुलै रोजी अनिल परब यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ पूर्ण होणार असून, मुंबई पदवीधर मतदारसंघातून त्यांना मैदानात उतरवलं जाऊ शकते. तर, त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांच्याही नावाची चर्चा आहे. त्यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. (Vidhanparishad Election)
तर मुंबई शिक्षक मतदार संघातून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्यावर नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर, कोकण पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे रायगडचे सह संपर्कप्रमुख व अनंत गीते यांचे अत्यंत विश्वासू किशोर जैन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर नाशिक शिक्षक मतदार संघासाठी विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम