नाशिक : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे (Vidhan Sabha Election) वेध लागले असून, या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांकडून राज्यातील विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेतला जात असून, इच्छुकांच्या मुलाखतीही सुरू आहे. दरम्यान, नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने आणि शिवसेना ठाकरे गटाने थेट उमेदवारही जाहीर केले आहेत. मात्र, जागावाटपापूर्वीच उमेदवारी जाहीर केल्याने युती आणि आघाडीच्या इतर घटक पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी दिंडोरीतून नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांची उमेदवारी जाहीर केली.
तर, ठाकरे गटाकडूनही(Shiv Sena Thackeray Group) गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील मतदार संघांचा आढावा घेतला जात होता. यानंतर जिल्ह्यात आढावा बैठकीत नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर(Sudhakar Badgujar) आणि नाशिक मध्य मतदार संघातून माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, झिरवाळ यांच्या उमेदवारीवर शिंदे गटाने (Shiv Sena Shinde Group) आक्षेप घेतला असून, आता ठाकरे गटाच्या उमेदवारीवरही काँग्रेसने (Congress) आणि शरद पवार गटाने (NCP Sharad Pawar Group) आक्षेप घेतला आहे.
Nashik Shivsena | नाशिकमध्ये ठाकरे गटाचे दोन उमेदवार जाहीर; मविआत वादाची ठिणगी..?
Vidhan Sabha Election | नाशिक मध्यच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही
ठाकरे गटाने परस्पर उमेदवारांच्या नावाचा ठराव केल्याने घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, नाशिक मध्यची जागा ही कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाला मिळायला पाहिजे, असा काँग्रेस बैठकीत ठराव झाला असल्याची माहिती काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील (hamlata patil) यांच्याकडून देण्यात आली आहे.
शरद पवार गटाचीही नाराजी; माजी आमदराचा खोचक टोला
दरम्यान, महाविकास आघाडीत अजून जागावाटप किंवा जागावाटपाची चर्चा पूर्ण झालेली नसताना ठाकरे गटाकडून उमेदवारांच्या नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याने यास राष्ट्रावादी शरद पवार गटाने विरोध दर्शवला असून, माजी आमदार नितीन भोसले यांनी यावरुन ठाकरे गटाला खोचक टोलाही लगावला आहे. (Vidhan Sabha Election)
“शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिमच्या या दोन मतदार संघासाठी उमेदवारांची नावे एक मतांनी ठरवण्यात आली असून, त्यांना शुभेच्छा”, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosale) यांनी ठाकरे गटाला लगावला असून, “महाविकास आघाडी म्हणून कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र आगामी विधानसभा लढणार आहोत. पक्ष पातळीवर आणि वरिष्ठ स्तरावर जेव्हा याबाबत निर्णय होईल आणि वरून जो काही निर्णय येईल तो मान्य असेल, असंही यावेळी माजी आमदार नितीन भोसले म्हणाले.
NCP Ajit Pawar | नाशिकमधील अजित पवार गटाचा पहिला उमेदवार जाहीर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम