अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विदर्भवाद्यांची घोषणाबाजी

0
14

वर्धा : वर्धा येथे होत असलेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चे Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत असताना एक अनुचित प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे.कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना काही विदर्भवादी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी वेळीच दखल घेत या गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

विदर्भवाद्यानी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी कागद देखील भिरकावले. यंदाचे अखिल भारतीय साहित्य संमेलन विदर्भात होत आहे. बेळगावच्या साहित्य संमेलनात वेगळ्या महाराष्ट्राचा ठराव मांडला गेला तसाच ठराव वर्ध्यातील साहित्य संमेलनात मांडला जावा अशी आम्हा विदर्भवाद्यांची इच्छा असल्याचं गोंधळ करणाऱ्यांनी म्हटले आहे.

लाखो ग्राहकांना फटका; Vodafone-Idea चे नेटवर्क झाले गायब

विदर्भावर नेहमीच अन्याय होत आला आहे. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे. तसेच विदर्भातील शेतकरी देखील अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. मात्र सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे वेगळा विदर्भ आणि आपल्या इतर मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भवाद्यांनी हे आंदोलन केले.
यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय?
याविषयी एकनाथ शिंदे म्हणाले की हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडायला वेगवेगळे व्यासपीठ आहेत. या मान्यवरांचे स्वागत आपण आदरातिथ्याने केले पाहिजे. सरकारची दारे २४ तास तुमच्यासाठी उघडी आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे कृपया तुम्ही गोंधळ घालू नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भवाद्यांना केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here