vendilisam : मणीपूर पाठोपाठ आता हरियाणामध्ये देखील हिसांचार वाढला आहे. हरियाणामधील नूंह जिल्ह्यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक यात्रेदरम्यान झालेला हिंसाचार आणि तणावानंतर येथे मोठ्या प्रमाणावर निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. नूंहमधील हिंसाचारानंतर पोलिसांनी २६ एफआयआर दाखल केला असून हिंसेच्या व आगीच्या घटनांमध्ये सुमारे १४० वाहने पेटवून देण्यात आली आहेत. Hariyana vendilisam त्याबरोबरच ६ जणांचा मृत्यू झाला आहे. इतके नव्हे तर नूंह येथे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या वाहनावर हल्ला करून ते पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात न्यायाधीश आणि त्यांची तीन वर्षांची मुलगी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.(Hariyana vendilisam)
विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेवर दगडफेक करण्यात आलू.
नूंह शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी नुसार, अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अंजली जैन यांच्या वाहनावर हल्लेखोरांनी दगडफेक आणि गोळीबार केला. नूंह येथील हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्याची परवानगीही प्रशासनाकडून घेण्यात आली होती. सोमवारी ब्रिज मंडळाच्या(Hariyana vendilisam) यात्रेदरम्यान त्यावर दगडफेक करण्यात आली. काही वेळातच दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला. शेकडो गाड्या जाळण्यात आल्या. सायबर पोलिस स्टेशनवरही हल्ला केला गेला व गोळीबारही झाला.(Hariyana vendilisam)
याशिवाय एका मंदिरात शेकडो लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर लोकांना तेथून बाहेर काढण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांवरही हल्ले झाले.(Hariyana vendilisam)
https://thepointnow.in/fda-raid/
नुहानंतर लगेचच सोहना येथेही दगडफेक आणि गोळीबार झाला. यानंतर हिंसाचाराची आग फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरली. अंजली व त्यांची तीन वर्षांची मुलगी आणि गनमॅन सियाराम सोमवारी दुपारी त्यांच्या कारमधून औषधे घेण्यासाठी नल्हार येथील एसकेएम मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते.(Hariyana vendilisam)
त्या मेडिकल कॉलेजमधून परतत असताना दिल्ली-अलवर मार्गावरील जुन्या बसस्थानकाजवळ सुमारे १५० दंगलखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. दंगलखोर त्यांच्यावर दगडफेक करत होते. त्यातील काही दगड कारच्या मागील काचेवर आदळल्यानंतर दंगलखोरांनी परिसरात गोळीबार केला. त्यामुळे गाडी रस्त्यावर सोडून जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. दुसऱ्या दिवशी त्या गाडी पाहायला गेल्या असता दंगलखोरांनी ती गाडी जाळल्याचे समजले. हरियाणातील अनेक शहरे व गावांमध्ये अद्यापही तणावपूर्ण वातावरण आहे.(Hariyana vendilisam)
दरम्यान जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या एकूण १५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७ आरएफ, ४ बीएसएफ, २ सीआरपीएफ, २ आयटीबीपीच्या तुकड्या तैनात आहेत. दरम्यान, हिंसाचारा प्रकरणी आतापर्यंत एकूण ३६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. हिंसाचार व जाळपोळ वाढल्याने अंजली जैन यांना आपल्या चिमुकल्या मुलीसह जीव वाचवून पळून जावे लागले.(Hariyana vendilisam)
अंजली जैन व त्यांची मुलगी तसेच त्यांच्या सोबतचे कर्मचारी यांना नूह येथील बसस्थानकावरील कार्यशाळेत आश्रय घ्यावा लागला, त्यानंतर ज्यांच्या ओळखीच्या काही वकिलांनी त्या सर्वांची तेथून सुटका केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम