Nashik : मणिपूर अत्याचार निषेधार्थ काढलेल्या मोर्चात जमावाद्वारे दगडफेक

0
8

Nashik : मणिपूर येथे महिलांना नग्न केल्याच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे आदिवासी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीद्वारे काढण्यात आलेल्या मोर्चाला आज हिंसक वळण लागले

मणिपूर येथे होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सटाणा येथे आज (दि. 29 जुलै) रोजी वंचित बहुजन आघाडी आणि आदिवासी संघटनांद्वारे मोर्चा काढण्यात आला होता. मात्र अचानकपणे या मोर्चातील काहींनी मार्गावरून जाणाऱ्या ट्रक, बसेसवर दगडफेक केल्याने, मोर्चाला हिंसक वळण लागले. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

जमावाने केलेल्या दगडफेकीमुळे बसेससह इतर वाहनांच्या देखील काचा फुटल्याने नुकसान झाले आहे. मोर्चातील जमावाने वाहनांवर चढून हातात झेंडे घेत घोषणाबाजी केली. मोर्चा दरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे मोर्चाला हिंसक वळण लागले. यामुळे पोलिसांना देखील मोठी कुमक बोलवावी लागली.

दरम्यान, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी या मोर्चात सहभाग न घेतल्याने जमावाने संताप व्यक्त करत ही दगडफेक केल्याचे बोलले जात आहे. सटाणा येथे झालेल्या या दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here