Varanasi Lok Sabha | मतदान वाढवण्यासाठी महिलांनी ढोल, थाळ्या वाजवण्याचा मोदींचा सल्ला

0
23
Varanasi Lok Sabha
Varanasi Lok Sabha

Varanasi Lok Sabha |  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘४०० पार’ चा नारा दिला असून, यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. तर, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) संपूर्ण देश पिंजून काढला आहे. ते वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढवत असून, त्यांनी मतदान वाढवण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. मतदारसंघातील महिला मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रापर्यंत ढोल, थाळ्या वाजवत, गाणी गात आणण्याचा सल्ला दिला आहे.(Varanasi Lok Sabha)

मंगळवार रोजी पंतप्रधान मोदींनी वाराणसी मतदारसंघातील महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, यावेळी २५ ते ३० महिलांना एकत्रित करा आणि ढोल वाजवत, थाळ्या वाजवत, गाणी गात त्यांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन या. सकाळी दहा वाजेपर्यंतच आपण प्रत्येक मतदान केंद्रावर २० ते २५ असे गट केले तर मतदान वाढेल, असे मोदी म्हणाले. (PM Narendra Modi Constituency)

ModiRaj | उद्या प्रचार संपणार, आज वातावरण तापणार; दोन्ही गटांचे ‘महाशक्तिप्रदर्शन’

Varanasi Lok Sabha | त्यांनी महिला आरक्षणालाही विरोध केला

एक जूनला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात वाराणसी (Varanasi) मतदारसंघात मतदान होणार आहे. मागील दोन निवडणुकीत मोदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. तर, यावेळीही त्यांचे हे मताधिक्य वाढविण्याचे लक्ष्य असून, त्यासाठी त्यांनी मंगळवारी नारी शक्ती संमेलनाचे आयोजन केले. (Latest Political News)

यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस व समाजवादी पक्षावर टिका केली असून, “काँग्रेस हे आरक्षणविरोधी असून मित्रपक्ष असलेली समाजवादी पार्टीदेखील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अत्यंत उदासीन आहे. इंडी आघाडीची मानसिकता ही कायम महिलांच्या विरोधात राहिली आहे. त्यांनी महिला आरक्षणालाही विरोध केला होता. ज्या ज्या ठिकाणी त्यांचे सरकार आहे. तिथे महिलांचे जगणे मुश्किल असल्याचा जोरदार हल्लाबोल यावेळी मोदींनी चढवला. (Varanasi Lok Sabha)

PM Modi In Nashik | आमच्या काळात सर्वाधिक कांदा निर्यात; माझे शेतकरी मला विसरणार नाही

महिलांशिवाय घर चालू शकत नाही तर देश कसा चालेल

तसेच वाराणसी मतदार संघातील नागरिकांना यूपी आणि बिहारमधील जंगलराज ज्ञात आहे. तिथे आमच्या आई-बहिणींना आपल्या घरातून बाहेर पडणेदेखील कठीण होत होते. सुरक्षेच्या कारणास्तव मुलांना त्यांचे शिक्षण सोडून घरी बसावे लागत होते.(Varanasi Lok Sabha)

आमच्या सरकारच्या सामजिक कल्याण योजनांमुळे निवास, मोफत अन्न, आरोग्य, अनुदानित गॅस यामुळे प्रत्येक कुटुंबात आता खूप पैशांची बचत होते. मागील दहा वर्षांत पहिल्यांदाच आता महिला सरकारी धोरणं व निर्णयांमध्ये अग्रेसर आहेत. महिलांशिवाय साधे घर चालू शकत नाही, तर आपला देश कसा चालेल..? गेल्या ६० वर्षांचे सरकार असलेल्यांना ही गोष्ट समजली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here