Crime update : उपनगर गुन्हे शोध पथकांनी चारचाकी गाड्यांची तोडफोड करणा-या चार संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर भर पावसात रात्री त्यांची धिंड काढली. सोमवारी मध्यरात्री नाशिकरोडला धोंगडे मळा येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालय समोर बंगल्याबाहेर लावलेल्या चार चारचाकी कार तलवार व कोयत्याने फोडल्या त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत या संशयितानाता ताब्यात घेतले आहे. त्यानंतर ही नाशिकरोडवर धिंड काढली.
सिडको येथे वाहनांची तोडफोड त्यानंतर रविवारी विहितगाव येथे वाहनांची जाळपोळच्या घटना घडल्यानंतर नागरिकांमध्ये संताप होता. पण, पोलिसांनी या संशयितांना अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. दारणा नदी किना-यावर हे संशयित लपून बसलेले होते. पोलिसांनी शुभम हरवीर बेनवाल उर्फ बाशी, रोशन उर्फ नेम्या रामदास पवार, मोइज् जावेद शेख व भैय्या उर्फ सत्यम देवल यांना ताब्यात घेतले. स्थानिक नागरिकांनी या संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत केली.
उपनगर पोलिसातील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस हवालदार विनोद लखन, पी एन गुंड, जयंत शिंदे, सुरज गवळी, राहुल जगताप, गौरव गवळी, अनिल शिंदे यांनी या आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना चांगली अद्दल घडवत धिंड काढली.
मागील काही दिवसांपूर्वी देखील नाशिक रोड परिसरात अशाच प्रकारे टवाळा खोरांकडून वाहनांची तोडफोड करत जाळपोळ करण्यात आली होती त्यावेळी देखील पोलिसांनी त्यांना काही तासात ताब्यात घेत त्यांची परिसरातून धिंड काढली होती.
शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर पोलिसांची सध्या करडी नजर असून ज्या ठिकाणी ते गुन्हा करतात त्याच ठिकाणी त्यांची धिंड काढण्यात येत असल्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांप्रतीचा विश्वास दृढावत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम