Skip to content

Mns strike : म्हणून त्यांनी थेट रस्त्यावर केली भाताची लागवड


Mns strike : पेठ तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करंजाळी हरसुल राज्यमार्ग हा अतिशय निकृष्ट असल्याने करंजाळी हरसुल मार्गावर भात लावा आंदोलन करण्यात आले.

या रस्त्याचे काम सुरू असताना लगतच्या गावांतील नागरिकांनी निकृष्ट कामाबद्दल वारंवार तक्रार करूनही निकृष्ट काम सुरूच होत राहिले.अनेक ठिकाणी अपूर्ण रस्ता असल्याने पाहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे तालुकाप्रमूख सुधाकर राऊत व महिला आघाडी तालुका प्रमुख मनिषा घांगळे यांच्या नेतृत्वाखाली भात लावा आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील निवेदनात नमूद सर्वच रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे यावर पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास तहसील कार्यालय पेठ समोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रसंगी माजी.जि.प.सदस्य श्री.सुधाकर राऊत ता.प्रमुख मनसे पेठ,श्रीमती मनिषा ,श्रीमती मनिषा घांगळे महिला आघाडी ता.प्रमुख,अक्षय गवळी वि.ता.प्रमुख,चंद्रकांत गवळी,चेतन शिंदे,प्रकाश गवळी,रविंद्र पवार,देविदास गांगोडे,विलास गायकवाड,राजेंद्र भोये,मनोज भोये,दिपक सापटे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

करंजाळी हरसूल रस्त्यासह तालुक्यातील इतर रस्त्यांच्या
दुरावस्थेमुळे महिला,पौढ,शालेय विद्यार्थी सर्वाना याचा दैनंदिन त्रास सहन करावा लागत आहे.
करंजाळी हरसूल रस्ता इस्टिमेंट प्रमाणे झालेला नाही.त्याची व तालुक्यातील ईतर दुरावस्थेत असलेल्या सर्व रस्त्यांच्या सुधारणाबाबत १५ दिवसात निर्णय न घेतल्यास तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल. असा सुचनावजा इशारा देण्यात आला आहे.
सुधाकर राऊत – तालुका प्रमुख मनसे, पेठ

दुदैव आमचे पेठ तालुका अजूनही मुलभूत सुविधांच्या शोधात आहे.भारताने चंद्रावर पाऊल ठेवले मात्र माझ्या पेठ तालुक्यातील सर्वसामान्य जनता हि गेली कित्येक वर्ष दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावरील खड्यांतच पाऊल ठेवून आहे.करंजाळी-हरसूल रस्त्याच्या निकृष्ट कामा मागे आशिर्वाद कोणाचा आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
मनिष घांगळे – महिला आघाडी तालुका प्रमुख, पेठ


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!