Breaking news : गावात अम्ब्युलन्स जाईल असा रस्ताच नसल्याने करावी लागली पायपीट ; त्या गरोदर महिलेचा अखेर मृत्यू

0
23

Breaking news : इगतपुरीसारख्या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यात जुनवणेवाडी येथील महिलेला मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे प्रसूतीवेदना सहन करीत पहाटेच्या वेळी अडीच किलोमीटर पायपीट करावी लागली.

पाऊस, प्रसूतीवेदना व पायपीट यामुळे अखेर या महिलेचे निधन झाले व मृत्यूनंतरही रस्त्याअभावी पुन्हा नातेवाईकांना तिचा मृतदेह डोली करून गावाकडे न्यावा लागला. शासनाला लाजिरवाणी असणारी ही घटना असून या गावात तातडीने रस्ता करावा, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक भगवान मधे यांनी केली आहे.

याबाबत माहिती अशी, की तळोघ ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून, मुख्य रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना अडीच किमी अतिशय कच्च्या रस्त्याने यावे लागते. हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झालेला आहे. जुनवणेवाडी येथील वनिता भाऊ भगत या गरोदर आदिवासी महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्याने पहाटे अडीच वाजता दवाखान्यात जाण्यासाठी नातेवाईक आणि तिने पायपीट सुरू केली. जास्तच त्रास होऊ लागल्याने तिला झोळी करून दवाखान्यात नेण्यात आले; मात्र अतिश्रमामुळे तिचे निधन झाले.

तिचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी घरी नेण्यासाठीसुद्धा पुन्हा कच्च्या रस्त्यामुळे डोली करून न्यावे लागले. या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे. जुनवणेवाडीसारख्या अनेक गावांत रस्ताच नसल्याने अनेक निरपराध व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत असल्याने आता तरी वाहतुकीस योग्य रस्ता व्हावा, अशी अपेक्षा जुनवणेवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

https://thepointnow.in/that-video-from-palghar-went-viral/

एकीकडे पालघर मध्ये गरोदर महिलेला उलट्या होत असल्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोली करून ग्रामस्थांना माने एवढ्या पाण्यातून नदीप्रवाहातून रस्ता काढावा लागला तर दुसरीकडे इगतपुरी तालुक्यामध्ये रस्ताच नसल्यामुळे महिलेला पायपिट करत दवाखाना गाठावा लागला आणि या तिचा दुर्दैवी मृत्यू झाला यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here