UPA अध्यक्षपदासाठी शरद पवारांच्या नावावर जोर?

0
34

द पॉईंट नाऊ ब्युरो : UPA च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निवड व्हावी याची जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे केली जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणीची आज दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीत याबाबत ठराव मांडण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आज दिल्ली येथे बैठक पार पडली. यात UPA चे अध्यक्षपद शरद पवार यांना देण्यात यावे, याबाबत ठराव मांडण्यात येऊन तो मंजूर देखील करण्यात आला. या बैठकीस शरद पवार देखील उपस्थित असल्याने, याचे महत्व वाढले आहे.

सध्या UPA च्या अध्यक्षपदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या आहेत. मात्र काँग्रेस पक्षाची राजकीय मैदानात होत असलेली पिछेहाट बघता, त्यांच्याच पक्षातून बऱ्याच प्रमुख नेत्यांनी काँग्रेसची धुरा आता गांधी घराण्या व्यतिरिक्त इतर कोणाकडे देण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, आज दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मांडण्यात आलेल्या या प्रस्तावाने, आता सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. आता याबाबत काँग्रेस नेते काय विचार करत असतील, काय निर्णय होऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here