Maharashtra | राज्याच्या काही भागात आज अवकाळी पाऊस; शेतकरी चिंचेत

0
21

Maharashtra | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कधी ऊन कधी पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. दरम्यान आता अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कमी झाल्याने पावसाची रिमझिम कमी झालेली आहे. असं असून तरीही राज्यासह देशात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळण्याचा असा अंदाज आहे.

देवळा तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन

आजही काही भागात अवकाळी पावसाची हजेरी

IMD च्या माहितीनुसार, देशात पावसाचा नवा टप्पा सुरु होण्याची चिन्हे दिसता आहेत. कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू, केरळमध्ये दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी असणार आहे, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागात हवामान ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे देशासह राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीदेखील बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज?

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टी विरलेला असला तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं असून यामुळे देशभरातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम वायव्य दिशेकडे सरकणारा बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार आहे. यामुळे गेल्या दोन दिवसात दक्षिणेतील केरळ, तामिळनाडूमध्ये पाऊस झालेला आहे. सातारा,पुणे, कोल्हापूर आणि सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तापमानात घट पहायला मिळणार असून हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.

Mumbai | आदित्य ठाकरेंना अटक होणार..? BMC ने केला गुन्हा दाखल

आता आणखी गारठा वाढणार

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश तसेच इतर भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याशिवाय आसाम, मणिपूर, मिझोरम आणि नागालँडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ओडिशा तसेच पश्चिम बंगालच्या काही किनारपट्टीच्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामध्ये सतपारा, पुरी, जगतसिंग, केंद्रपारा, नंदीग्राम आणि दक्षिण 24 परगणा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here