द पॉईंट नाऊ ब्युरो : ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांना दिला आहे. सध्या सुरू असलेल्या बंड प्रकरणावर त्यांनी बंड केलेल्या आमदारांना हा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पूर्णतः हादरून निघाली. त्यात शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 हुन अधिक आमदार गेले असल्याने, हा एक झटकाच आहे.
या प्रकरणावर भाष्य करतांना उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना इशारा दिला. मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. म्हणणारे पळून गेले. आता शिवसेना आणि ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा. असा इशारा ठाकरे यांनी बंड केलेल्या आमदारांना दिला आहे.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदे काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यानच्या काळात आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून बंडाचे कारण स्पष्ट केले होते. मात्र आता ठाकरे यांच्या या इशाऱ्याला ते काय उत्तर देतात. याकडे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम