मुंबई : ह्या ४० डोक्याच्या रावणाने प्रभू श्रीरामाचे शिवधनुष्य गोठवले, यासाठी थिजलेली मन आणि गोठलेले रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हणजे, सळसळते रक्त आणि तापलेले डोकं, त्यामुळे गोठलेल्या रक्तवाल्याचे इकडे काही कामच नाही, अश्या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली.
काल शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले होते. त्या पार्श्वभूमीवर आज मतोश्रिवरील बैठक पार पडल्यानंतर त्यांनी नुकताच जनतेशी व्हिडियो कोन्फेरेंसद्वारे जाहीर संवाद साधला. त्यात त्यांनी ठाकरे गटाचे तीन पर्यायी नवे व निवडणूक चिन्हे जाहीर केली आहे. ही तीन पर्यायी नावे व चिन्हे उद्या निवडणूक आयोगासमोर ठेवली जाणार आहेत. ठाकरे गटाने ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ व ‘मशाल’ ही पर्यायी चिन्हे व ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही पर्यायी नावांचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. यावर बोलताना ठाकरेंनी लवकरात लवकर आम्हाला चिन्हे आणि नावे द्या, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटावर जहरी टीका केली. यावेळी ते बोलताना शिंदेना स्वतः शिवसेनाप्रमुख व्हायचं आहे, ते आता अति होतंय. तसेच दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने शिवाजी पार्क मिळू नये, यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला व मेळावा अभूतपूर्व झाला. तिकडचा पंचतारांकित, तर आमचा साधा-सुधा मेळावा असे म्हणत सर्व शिवसैनिकांचे आभार मानले. तसेच शिवसेनेने ज्यांना मोठे केले, तेच आता शिवसेना संपवायला निघाली होती. असे म्हणत शिवसेनेचा इतिहास सांगितला.
उद्धव ठाकरे यांच्या लाईव्ह मधील काही मुद्दे :
– शिवसेनाप्रमुख मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत होती. त्याचा व्याप वाढतावाढता पुढे ते शिवसेना हे नाव पडले, असे म्हणत शिवसेनेचा इतिहास सांगितला. तसेच त्यातील काही गोष्टी मी स्वतः पहिला आहे, असा उल्लेख त्यांनी केला. ही सर्वसामान्यांची संघटना आहे.
– काहीवेळा संकटे आली, पण संकटावेळी शिवसैनिक जीवाची बाजी लावली. त्यात काहींची जीवे गेली. पण मोडेन पण वाकणार नाही, त्यातून ही शिवसेना उभी राहिली.
– शिवसेनेचे नाव व चिन्हे आयोगाने गोठवले. याला ४० डोक्याच्या रावणाने प्रभू रामाचे शिवधनुष्य गोठवले, यासाठी थिजलेली माने आणि गोठलेले रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटले की सळसळते रक्त आणि तापलेली डोकी. या गोठलेल्या रक्तवाल्याचे इकडे कामच नाही, अशी टीका शिंदे गटावर केली आहे.
– ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला, ही शिवसेना तुमची राजकीय आई आहे. तिच्याच काळजावर कट्ट्यार घुसवली आहे. अशी उलट्या काळजाची माणसे, ज्याने शिवसेनेचे नाव व चिन्हे गोठवले आहे. त्यांना आनंदाने उकळ्या फुटत असतील पण त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे, तिला सर्वात जास्त आनंद झाला आहे. असे म्हणत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
– ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, मराठी मने पेटवली आणि हिंदु आस्मिता जपली. त्या शिवसेनेचा घात करायला निघालात, ते पवित्र नाव गोठवले. काय मिळणार आहे तुम्हाला…, असा सवाल त्यांनी केला आहे.
– हे हिंदुत्व असेच उभे राहिले नाही, बाळासाहेबांनी अंगावर धोके स्वीकारलेत, शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले, वडिलांनी रुजवले, तेच मी पुढे घेऊन जातोय. पण शिवसेना आणि तुमच्या नावाचा काय संबध आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी शिंदेना खडेबोल सुनावले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम