उध्दव ठाकरेंच्या पक्षातील महत्वाच्या नेत्यांना सुचना कि Iphone वापरा…पण नक्की का?

0
18

फोन टॅपिंग व फोन हॅकिंगच्या प्रकरणावर सावध भूमिका घेत उध्दव ठाकरे Uddhav Thackeray यांनी पक्षातील मुख्य नेते, उपनेते, आमदार,
खासदारांच्या पीएसह सर्व स्टाफला फक्त आयफोन IPhone वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.याबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिलेली आहे.राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता.त्यामुळे रश्मी शुक्ला फोन टॅपिंग phone tapping प्रकरणानंतर सावध भूमिका घेत असून उद्धव ठाकरे यांनी पक्षातील महत्वाच्या ,नेतेमंडळींना आयफोन वापरण्याच्या सुुचना दिल्या आहे. याआधी पेगासस pegasus स्पायवेअर सॉफ्टवेअरमधून मोठी चर्चा झालेली . पेगासस सॉफ्टवेअर वापरून मोबाईल हॅक करण्यात आला होता असा आरोप आहे. त्यावेळी ममता बॅनर्जी  यांनी मोबाईल फोनवर सेलोटेप लावून पत्रकार परिषद घेतल्याने यावर मोठी चर्चा झाली होती.

APMC Market बाबत दिले महत्त्वाचे आदेश; शिवसेनेच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

Android फोन खरंच सुरक्षित आहे का ?
Android फोन पहिल्यांदा सुरु केला कि त्यात अनेक नको असलेले अ‍ॅप्स दिसतात. हे अ‍ॅप्स अनेकवेळा नुकसानदायी ठरतात शिवाय ते फोनच्या परफॉर्मन्सवरही परिणाम करतात. काही अ‍ॅप्सला डिलीट करणे देखील कठीण होते. परंतु आयफोनमध्ये फक्त काही प्री-इंस्टॉल केलेले अ‍ॅप्स दिले आहेत आणिआम्ही ते सहजपणे अनइंस्टॉल करू शकतो. अँड्रॉइड फोनमध्ये सिस्टीम अपडेट करणे खूप क्लिष्ट आहे. अ‍ॅपल फक्त त्याच्या आयओएस डिव्हाइसेसना थेट अपडेट पुरवते.त्यामुळे अँड्रॉइड फोने खिफोने पेक्षा नक्कीच कमी सुरक्षित आहे.

Iphone इतके महत्व का ?
तज्ञांच्या मते, अँड्रॉइडपेक्षा अ‍ॅपल अधिक सुरक्षित आहे.याचे कारण असे कि अ‍ॅपलमध्ये सुरक्षा अधिक मजबूत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे अ‍ॅपल तुमच्या फोनला स्वतःहून कोणतेही अ‍ॅप चालवू देत नाही. आयफोनसाठी ऑपरेटिंग सॉफ्टवेअर विकसित करते, जे अ‍ॅपल कंपनीने स्वतः तयार केले आहे ज्याला IOS म्हणतात.आयओएस (IOS) साठी सर्व अ‍ॅप्स अ‍ॅपलच्या स्वतःच्या देखरेखीखाली वापरले जातात आणि कठोर चाचणीनंतरच अ‍ॅप स्टोअरवर ठेवली जातात.
आयओएस अ‍ॅप्समध्ये, अ‍ॅन्ड्रॉइड प्रमाणे परवानगी देण्याची सक्ती केली जात नाही. अ‍ॅपल तुमचा वैयक्तिक डेटा जाहिरात कंपन्यांना विकत नाही.
हे याचे मुख्य कारण आहे की आयफोन महाग आहेत. याशिवाय, एकदा तुम्ही लेटेस्ट आयफोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला पुढील सहा ते सात वर्षांसाठी नवीन ऑपरेटिंग सॉफ्टवेअर अपडेट्सचा सपोर्ट मिळतो,
ज्यामुळे तुमचा फोन नेहमी अपडेट राहतो.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here