Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच आज दुपारपासून पैसे वाटप प्रकरणाने राजकारणात खळबळ माजवली आहे. बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडेंवर करण्यात आलेल्या आरोपांवर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देत ‘भाजपचा नोट जिहाद सुरू आहे.’ असं म्हणत बोचरी टीका केली आहे.
Political News | ‘बविआ’चा उमेदवार फुटला?; सहा तास राडा घालून अखेर हितेंद्र ठाकूर तावडेंसोबत रवाना
नेमकं प्रकरण काय?
बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांकडून आज विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून विरार येथील एका हॉटेललात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी तावडेंना घेरत पैसे वाटप करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणाने राजकारणात खळबळ उडाली असून नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सदर प्रकरणी बोलताना उद्धव ठाकरेंनी, “विनोद तावडे यांना पीएचडी मिळायला हवी. मागील काही दिवसांपासून त्यांचा कौतुक होत होतं की, राज्यांमध्ये सरकारकडून त्यांनी भाजपचे सरकार स्थापन केलं पण या मागचे रहस्य काय होते, ते आता समोर आले आहे. हा भाजपचा नोट जिहाद आहे. पैसे वाटू व जिंकू असे काहीतरी या मागचे गणित आहे. त्यामुळे याच्या विरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे.” असे म्हणत भाजपवर घणाघात केला आहे.
भाजप निर्घृण पद्धतीने राजकारण करत असून जिंकण्यासाठी वाटेल ते सुरू आहे. ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवर हल्ला झाला. तो कसा झाला याचा खुलासा झालाच पाहिजे. तावडे प्रकरण समोर आले हे कदाचित भाजपचेच गॅंगवॉर असू शकते भाजपतूनच अंतर्गत कोणीतरी टीप दिली असावी.” असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम