Uddhav Thackeray | मी पंतप्रधानांना नाही, पंतप्रधान मला शत्रू मानतात

0
11
Mumbai North West
Mumbai North West

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची आज राजापूर येथे भव्य सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. यांच्या कारभाराचे चटके संपूर्ण देशात बसत आहे, या शब्दात टिका केली. तर, “रायगड मधील मुस्लिम बांधवांनी आम्हाला मराठी भाषेतील कुराण दिले, त्यांनाही आपले हिंदुत्व कळाले आहे. कारण आमचे हिंदुत्व हे धर्माधर्मात आग लावणारे नाही. मी साळवीची पाठ थोपटायला येथे आलोय” अशी कौतुकसुमने त्यांनी आमदार राजन साळवींवर उधळली आहे. (Uddhav Thackeray)

जे जाहिराती करताय, त्यांची चौकशी करा

आजच्या राजापूर येथील सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘आमदार राजन साळवी यांच्यावर आरोप केले होते. राजन साळवी यांची मालमत्ता सापडली असेल तर, राजापुरमध्येच जे नवीन इच्छुक उमेदवार खर्च करत आहेत, त्यांच्या घरी आधी धाडी टाका. त्यांनी हे पैसे कोठून आणले?, त्यांच्या घरांवर धाड टाका आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, जे जाहिराती करताय, त्यांची चौकशी करा.”

Nashik News | नाशिकमधील चौकशीत ईडीला यश; कोट्यवधींचे घबाड सापडले

Uddhav Thackeray | मिंधेच्या पक्षात साळवी जात नाही

राजन साळवींच्या घरी काही मिळालं नाही तर, त्यांनी त्यांच्या घरातील वस्तूंची किंमत काढली. एसीबी अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावली. त्या मिंधेच्या पक्षात साळवी जात नाहीत म्हणून राजन साळवींवर ही सुद वृत्तीने कारवाई करण्यात येत आहे, असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.(Uddhav Thackeray)

Eknath Shinde | ‘पीएमएलए’ कायद्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांना अटक करा..?

मी पंतप्रधानांना नाही, ते मला शत्रू मानतात

मी पंतप्रधानांना नाही तर, ते पंतप्रधान मला शत्रू मानतात. कारण त्यांनीच आपली शिवसेना फोडली आहे. नव्हे, शिवसेना चोरली आहे. ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकटाच्या काळात मदत केली होती. त्या बाळासाहेबांचीच त्यांनी चोरी केली आणि चोरालाही मदत केली. नंतर त्या चोराला मुख्यमंत्री म्हणून बसवलं. तिकडे मध्य प्रदेशमध्ये नितीश कुमारांना तोडलं आणि सोरेन यांना तुरुंगात टाकलं. आता केजरीवालांच्या मागे लागले आहेत. इकडे राजन साळवी, रवींद्र वायकर, सूरज चव्हाण यांच्या मागे लागलेत. अबकी बार ४०० पार नाही. तर, अबकी बार भाजप तडीपार” अशी टिका उद्धव ठाकरेंनी केली आहे. (Uddhav Thackeray)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here