Uddhav Thackeray | उद्या त्यांच्या चितेवर कोणीच रडणार नाही – उद्धव ठाकरे

0
68
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray |  काल अयोध्या येथे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, काल शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला न जाता नाशिकमध्ये दाखल झाले. काल त्यांनी भगुर येथे स्वतंत्र्य वीर सावरकरांच्या स्मृति स्थळाला भेट देत अभिवादन केले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी सहकुटुंब पंचवटी येथे काळाराम मंदिरात दर्शन घेतले आणि गोदा आरतीही केली. दरम्यान, आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून, त्यांना अभिवादन करून नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन हे डेमोक्रसी हॉटेलमध्ये पार पडला.(Uddhav Thackeray)

या अधिवेशनात पाच ठराव मांडले गेले. यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या आमदारांवर ज्या ईडीच्या धाड पडत आहेत. त्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. काल काही विद्वानांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली. नाही, त्यांची तुलना होऊ शकत नाही. त्यावेळी परकीय आक्रमनांपासून महराष्ट्राने देश वाचवला होता. मी बोललो होतो त्यानुसार, शिवजन्मभूमीची माती घेऊन अयोध्येला गेलो होतो. आणि त्यानंतर काही दिवसांतच सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा निकाल दिला. महाराष्ट्रावर जो कोणी चालून आला त्या सर्वांना महाराष्ट्राने मूठ माती दिली, असे प्रतिपादन यावेळी ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray | ‘मेरिही दाढी सफेद’ असे बदमाश नाशिकमध्ये; सुषमा अंधारेंचा भूसेंवर वार

Uddhav Thackeray | ‘रामची बात झाली तर, आता काम की बात’

राम हा कुणा एकट्या पक्षाचा नाही आणि जर तुम्हाला असे वाटत असेल तर, आम्हाला सुद्धा भाजपमुक्त प्रभू श्री राम करावा लागेल. कालच कार्यक्रम झाला. ‘रामची बात झाली तर, आता काम की बात’ करो. पहिल्या पाच वर्षात पंतप्रधान सगळे देश फिरले पण, अयोध्येत नव्हते गेले. हे सगळे शिवसैनिक ही माझी वाडीलोपार्जित संपत्ती. आयहे मी घराणेशाही, ही मला घरणेशाहीकडून मिळालेली संपत्ती आहे. तुम्ही दिल्लीत बसावं यासाठी आम्ही प्रचार केले. तुम्ही दिल्लीत जावे यासाठी माझ्या मर्द शिवसैनिकांनी प्रचार केले. (Uddhav Thackeray)

आणि आता माझे शिवसैनिक तुम्हाला भ्रष्टाचारी वाटताय. मुंबई पालिकेचे घोटाळे काढताय. तर, सगळेच घोटाळे काढा. पीएम केअर फंडचेही घोटाळे काढा. कोरोना काळात यांनी लोकांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले. घोटाळ्याची सुरुवात पीएम केअर फंडपासून झाली. त्याचा आधी होशोब द्या. भ्रष्ट लोकांची आम्हीही चौकशी करू आणि त्यांनाही आत टाकू.

Uddhav Thackeray | उद्धव साहेब ‘वेट अँड वॉच’ आपलीही वेळ येईल – संजय राऊत

३० वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची निर्लज्ज भाजप नाही झाली

महाराष्ट्रावर चालून आले त्यांना कसं महाराष्ट्राने गाडून टाकलं, हे मला त्यांना दाखवायचे आहे. काही म्हणतात की शिवसेनेची कॉंग्रेस झाली. ३० वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची निर्लज्ज भाजप नाही झाली. तर, कॉंग्रेस काय होईल. स्वातंत्र्यासाठी कॉंग्रेसच लढत होती. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवतो.(Uddhav Thackeray)

फक्त ‘जय श्री राम’ बोलू नका, तसे वागा. हे असे आहेत तरी हे असे असणार नाही. दिवस आमचा असाच असणार नाही. खरे आहे की घेतले त्यांनी सर्वच ठेके, मात्र उद्या त्यांच्या चितेवर कोणीच रडणार नाही,” यावेळी उद्धव ठाकरे यांनी कवितेच्या काही ओळी बोलून दाखवल्या. ‘तोडा फोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजांची नीती भाजपने पुढे चालू ठेवलीय, अशी टीकाही यावेळी ठाकरेंनी भाजपवर केली. तसेच ‘होऊन जाऊदे चर्चा’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याचे आवाहनही उपस्थित पदाधिकऱ्यांना केले. ते छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही.आम्ही ते कदापि होऊ देणार नाही. तसेच संध्याकाळी जाहीर सभेला उपस्थित राहण्याचेही आव्हन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here