Uddhav Thackeray | ठाकरे गटाचं आज नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शन

0
48
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray |  काल अयोध्या येथे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र, काल शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला न जाता नाशिकमध्ये दाखल झाले. काल त्यांनी भगुर येथे स्वतंत्र्य वीर सावरकरांच्या स्मृति स्थळाला भेट देत अभिवादन केले. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी सहकुटुंब पंचवटी येथे काळाराम मंदिरात दर्शन घेतले आणि गोदा आरतीही केली. दरम्यान, आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून, त्यांना अभिवादन करून नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन हे डेमोक्रसी हॉटेलमध्ये थोड्याच वेळात पार पडणार आहे.

या अधिवेशनात पाच ठराव मांडले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा असणार असल्याचीही माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे हे नाशिमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या आमदारांवर ज्या ईडीच्या धाड पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवरही उद्धव ठाकरे काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल; कसा असेल नाशिक दौरा

यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, आणि त्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. या अधिवेशनानंतर संध्याकाळी ठाकरे यांची अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा देखील पडणार आहेत.  यासाठी संपूर्ण नाशिक शहरात नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वातावरण निर्मिती आणि बॅनरबाजी करण्यात आलेली आहेत.

Uddhav Thackeray | जाहीर सभेची तयारी 

संध्याकाळी नाशिकच्या गोल्फ क्लब अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची तोफ नाशिकमध्ये आता कोणावर धडाडणार हे पहावे लागणार आहे. दरम्यान, या सभास्थळी ७० बाय ४० फूटच्या मुख्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. या स्टेज समोरच २ हजार निमंत्रितांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी तब्बल ७० ते ८० हजार लोक उपस्थित असतील असा अंदाज आहे. दरम्यान, आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे कुठली राजकीय खेळी खेळणार? तसेच शिवसैनिकांना ते काय मार्गदर्शन करताय? हे पहावे लागणार आहे.(Uddhav Thackeray)

Uddhav Thackeray | असा असेल उद्धव ठाकरेंचा ‘नाशिक दौरा’

आज हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून, हाच मुहूर्त साधत ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन पार पडणार आहे. तसेच यानंतर जाहीर सभाही पार पडणार आहे. दरम्यान, या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार. हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. (Uddhav Thackeray)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here