Skip to content

हे बंड ठाकरेंच्या आदेशाने ? ; का आहे प्लॅन वाचा सविस्तर


मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाने सर्वच धास्तावले आहेत मात्र हे बंद लिखित असल्याचे बोलले जात आहे. ठाणे शहराव्यतिरिक्त फारसा प्रभाव नसलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मायबाप मानलेल्या ठाकरेंच्या विरोधात बंड कसे करू शकतात त्यात कॅबिनेट मंत्र्यांसह सेनेचे 40 आमदार सहभागी होतात, यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. MIM चे जलील म्हणाले की हे ठरवून केलेलं बंड आहे. निष्ठावंत शिवसैनिक फुटणे शक्य नसल्याचे ते म्हटले आहेत.

दोन दिवसापासून एकामागोमाग एक आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडास पाठिंबा देत आहेत तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) रात्री भेटतात आणि लगेच सकाळी ते बंडखोर ठेवलेल्या गुवाहटीचा रस्ता पकडतात, संस्यासपद असल्याने सोशल मिडियात बोलले जात आहे. उघडपणे अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. हे आमदार जातात की त्यांना पाठविले जात आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते. असे असल्यास उद्धव ठाकरे यांनी हा गेम का केला हे बघण महत्वाचे असेल.

एकनाथ शिंदे यांचे बंड हे एक उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने असल्याचे बोलले जात आहे त्याला हे आहेत कारण

सेना राष्ट्रवादीत अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे जाईल असे वाटते, हे मुख्यमंत्रीपद देण्याचे टाळण्यासाठी ठाकरे यांनी ही खेळी केली असल्याचे बोलले जातेय. सेनेला केवळ अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हवे होते. ते आता पूर्ण झाले आहे. आता पुढील काळात पुन्हा भाजप-शिवसेना युती व्हावी, असेच ठाकरे यांना वाटत आहे.

लोकसभा निवडणूकीत सेनेला स्वबळावर इतके आमदार निवडून आणणे सोपे नसल्याने बोलले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रीपद घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले, असा विचार यामागे असल्याचे बोलले जाते. भाजपसोबत गेल्यास उपमुख्यमंत्रीपद, वाढीव मंत्रीपदे, केंद्रातही मंत्रीपद आणि याशिवाय सीबीआय, ईडी यांच्या सुरू असलेल्या चौकशा थांबणे, हा फायदा असल्याचे बोलले जात आहे.

याशिवाय शिवसेना-भाजप युती झाली तर मुंबई महापालिका पुन्हा सेनेच्या ताब्यात राहण्याचा मार्ग खुला मोकळा आहे, महाविकास आघाडी तोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा चेहरा वापरला जात असल्याचे तर्कशास्त्र यात मांडण्यात आले

या चर्चेविषयी पत्रकारांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांनाच प्रश्न विचारला. हे सारे कथित बंड शिवसेनेनेच तर घडवून आणले नाही ना, या सवालावर राऊत यांनी त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. पाठीमागून वार करण्याचा ठाकरे यांचा स्वभाव नाही, समोरासमोर ते लढत असतात. त्यामुळे अशा चर्चांत कसलाही अर्थ नाही असे बोलले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!