Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांकडून भाविकांना मारहाण; नेमकं काय घडलं..?

0
34
Trimbakeshwar
Trimbakeshwar

नाशिक : नाशिक येथील त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात (Trimbakeshwar Temple) दर्शनासाठी आलेल्या नाशिकच्या एका व्यक्तीला सुरक्षारक्षकांनी मारहाण केली आणि त्यांच्या वृद्ध आईला ढकलल्याने त्या पायऱ्यांवरून खाली पडल्या आणि जखमी झाल्या. या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी ते गेले असता, त्र्यंबक पोलीस ठाण्यात तीन तास बसूनही पोलिसांनी तक्रार घेतली नाही. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करून दिले नाही. अखेर सात तासांनी केवळ एनसी दाखल केल्याचे आरोप संबंधित कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेत जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी सुरक्षारक्षकांनी मारहाण केली असेल तर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. या प्रकणात नाशिक येथील महेंद्र सूर्यवंशी हे त्यांच्या आई-वडिलांसह त्र्यंबकेश्वर येथे मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन करताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर जाण्यासाठी घाई केली असता, त्यांची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी या  भाविकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप महेंद्र सूर्यवंशी यांनी केला आहे.

Trimbakeshwar | ‘दुष्काळाचे सावट दूर होवुदे’; पालकमंत्र्यांचे निवृत्तीनाथांना साकडे

 दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना

दरम्यान, या घटनेबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले की, काल नाशिक येथील सूर्यवंशी कुटुंब त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेत असताना त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याच्या प्रकरणावर आढावा घेऊन दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे वेळेत दर्शन होईल आणि त्यांना योग्य त्या सुविधा प्रशासन व मंदिर प्रशासनाकडून मिळतील, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचीही माहिती यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिली.

Trimbakeshwar | नववर्षात नाशिककर त्र्यंबकरायाच्या चरणी लीन; मात्र भाविकांमधून नाराजीचा सूर

Trimbakeshwar | तीर्थ चढवण्याच्या आग्रहामुळे वाद 

या घटनेबाबत मंदिर समितीच्या विश्वस्तांनी खुलासा केला असून ते म्हणाले की, सलग सुट्ट्या असल्याने काल त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठी गर्दी होती. यामुळे सुरक्षारक्षकांनी संबंधित भाविकांना पुढे जाण्यासाठी सांगितले. मात्र तरीही संबंधित भाविकांनी चार धामचे तीर्थ चढवण्यासाठीचा आग्रह केला. यावेळी बाचाबाची झाली आणि संबंधित वृद्ध महिलेचे पाय अडकून त्या खाली पडल्या. या आग्रहामुळेच वाद झाला असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत. तसेच या घटनेची चौकशी करून यावर योग्य ती कारवाई करू, असे मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here