Toll Update | वाहनधारकांसाठी गुड न्यूज! आता वाहनं न थांबता केली जाणार स्वयंचलित टोल वसुली

0
51
Toll Update
Toll Update

Toll Update | नवी दिल्ली | लोकसभेत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन वेगवेगळ्या कारणाने चांगलंच गाजताना दिसत आहे. यातच सध्या खासदारांचं केलं जाणारा निलंबन यावरून देशभरात चांगलीच खडाजंगी सुरु असून यातच अनेक मुद्दे अधोरेखित होत आहेत. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी माहिती दिली असून आता केंद्र सरकार देशात मार्च अखेरपर्यंत जीपीएस पद्धतीने टोल आकारणी करणार आणि त्यामुळे जितका रस्ता वापरला, तेवढाच कर वाहनधारकांना भरावा लागणार आहे.

Nashik Corona Alert | कोरोनाचं जोरदार पुनरागमन; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

दरम्यान, या निर्णयामुळे वाहनधारकांच्या खात्यातून हा टोल आपोआप वजा होणार असल्याने टोलनाक्यावरील जाणारा वेळ वाचणार आहे. केंद्रीय रस्ते बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून केंद्र सरकारने सध्याच्या टोल वसुली पद्धतीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार मार्च अखेरपर्यंत जीपीएस – आधारित टोलवसुली पद्धत ही नवीन तंत्रज्ञानासह देशात आणणार आहे.

Toll Update | काय असणार ही नवी प्रणाली ?

भारतातील टोल व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला असताना या निर्णयाचं देशभरात स्वागत करण्यात येत आहे. या नव्या यंत्रणेमुळे वाहनधारकांना टोल नाक्यावर टोलभरण्यासाठी थांबावे लागणार नसून टेलनाक्यावर लागणाऱ्या रांगांच्या जाचातून वाहनधारकांची सुटका होईल. स्वयंचलित टोल वसुलीसाठी ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन सिस्टम’ चे दोन पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहेत.

Manoj Jarange | शिष्टमंडळाचे साकडे मात्र मनोज जरांगे ‘या’ मागणीवर ठाम

यापुर्वी अनेक टोलनाक्यांवर वाहनांना सरासरी आठ मिनिटे थांबावे लागत होते. यानंतर फास्टॅग प्रणाली लागू करण्यात आली मात्र ही वेळ फक्त ४७ सेकंदांवर आली. दाट लोकवस्तीच्या शहरांजवळील टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी झालेली असली तरी मात्र काही ठिकाणी अजूनही टोलनाक्यांवर फार वेळ जातो. गर्दीच्या वेळी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागतात. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वीच नवी प्रणाली लागू करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here